नागपूर मेट्रोसाठीची तरतूद आमच्यामुळेच - फडणवीसांचा दावा - EX CM Devendra Fadanavis Reaction on Central Budget | Politics Marathi News - Sarkarnama

नागपूर मेट्रोसाठीची तरतूद आमच्यामुळेच - फडणवीसांचा दावा

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

'विरोधकांनी बजेट सादर होण्या पूर्वी प्रतिक्रिया लिहून ठेवली होती, आता ती ते बोलून दाखवत आहेत. नागपूर चा प्रस्ताव अमच्या सरकारच्या काळात गेला होता. म्हणून त्यासाठी तरतूद झाली. मुंबईच्या अनेक प्रकल्पांमध्ये यांनीच खोडा घातला आहे. गिफ्टस् सिटी गुजरातला जाण्याचं पातक काँग्रेसचे आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली

मुंबई : ''विरोधकांनी बजेट सादर होण्या पूर्वी प्रतिक्रिया लिहून ठेवली होती, आता ती ते बोलून दाखवत आहेत. नागपूर चा प्रस्ताव अमच्या सरकारच्या काळात गेला होता. म्हणून त्यासाठी तरतूद झाली. मुंबईच्या अनेक प्रकल्पांमध्ये यांनीच खोडा घातला आहे. गिफ्टस् सिटी गुजरातला जाण्याचं पातक काँग्रेसचे आहे. विरोधकांनी बजेट न वाजताच प्रतिक्रिया दिली आहे. पेट्रोल व डिझेलवरील अधिभाराचा एका पैशाचा बोजा सामान्यांवर पडणार नाही,'' अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. 

काही सरकारी कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीच्या योजनेवर विरोधक टीका करत आहेत. देश विकायला काढला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या विरोधी पक्षांनी व्यक्त केली आहे. त्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, "एलआयसीचा आयपीओ आल्यानंतर सामान्य माणूस शेअर घेईल. पण मालकी सरकारचीच राहील. नरसिंह राव, अटलजी, डाॅ. मनमोहनसिंग यांच्या पासून डायव्हर्जची प्रक्रिया सुरु आहे. मग प्रत्येकानेच देश विकायला काढला, असे म्हणावे लागेल. विरोधकांना काही कळत नाही. जे लिहून आणले ते बोलतात,''

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा आत्मनिर्भर भारताचा अर्थसंकल्प असल्याचे ते म्हणाले. नव्या कृषी कायद्यांवरून केंद्र सरकारच्या विरोधात ओरडणाऱ्या विरोधकांची या अर्थसंकल्पामुळे तोंडे बंद होतील, असेही फडणवीस म्हणाले. फडणवीस यांनी अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया देताना कृषी क्षेत्रातील तरतुदींवर भर देत विरोधकांवर टीका केली. दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनाची दखल या अर्थसंकल्पात घेतली आहे, असेही ते म्हणाले. बाजार समित्या मजबूत करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. मागील सरकारपेक्षा दुप्पट हमीभाव मोदी सरकारनं दिला आहे, असाही दावा फडणवीस यांनी केला.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख