प्रसंगी शिवसेनेशीही दोन हात करु; काँग्रेस नेत्याचा इशारा

महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांनी प्रत्येक निवडणुकीत युती करावी अशी मागणी होत आहे; मात्र असे असले तरी वर्षभराने होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत प्रसंगी शिवसेनेशीही दोन हात करण्याची कॉंगेसची तयारी आहे, असा इशारा कॉंगेस प्रचारप्रमुख नसीम खान यांनी दिला आहे
Naseem Khan
Naseem Khan

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांनी प्रत्येक निवडणुकीत युती करावी अशी मागणी होत आहे; मात्र असे असले तरी वर्षभराने होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत प्रसंगी शिवसेनेशीही दोन हात करण्याची कॉंगेसची तयारी आहे, असा इशारा कॉंगेस प्रचारप्रमुख नसीम खान यांनी दिला आहे. महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्धारही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

मागील वर्षी सरकारमध्ये लेखी स्वरूपातील किमान समान कार्यक्रमाच्या आधारे सहभागी झालो आहोत. त्याचा आगामी महापालिका निवडणुका कशा प्रकारे लढवाव्यात याच्याशी काहीही संबंध नाही. महत्त्वाचे म्हणजे मुंबईचा विकास हाच पक्षाचा ध्यास आहे. १९९७ पासून पालिकेत सत्तेवर असलेले शिवसेना व भाजप हे दोनही पक्ष शहरवासीयांना सुविधा न मिळण्यास जबाबदार आहेत. त्यामुळे आता मुंबईकरांना जास्तीत जास्त सोयी-सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करणे हेच आमचे ध्येय आहे, असे खान यांनी सांगितले. 

मुंबईतील शहरवासीयांच्या समस्या वेगळ्या आहेत तसेच पश्‍चिम आणि पूर्व उपनगरवासीयांच्या समस्या वेगळ्या आहेत. या समस्यांवर लक्ष केंद्रित करून त्या ठराविक कालावधीत सोडवण्याचा रोडमॅप तयार केला जाईल. राज्य सरकारमध्ये शिवसेनेचे सहकारी असलो तरी मुंबई महापालिकेत आम्ही विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे लोकांच्या समस्या सोडवण्याबाबत, त्यांना सोयी मिळण्याबाबत आम्ही कसलीही तडजोड करणार नाही. त्यासाठी आम्ही भांडणारच, अशा शब्दांत त्यांनी प्रसंगी महापालिकेत शिवसेनेशीही दोन हात केले जातील असेही त्यांनी सूचित केले.

महापालिका निवडणुकीत सर्वच्या सर्व म्हणजे २२७ जागा कॉंग्रेस पक्ष स्वबळावर लढवेल. पक्षाचे सर्व नेते व कार्यकर्ते यांची हीच इच्छा असल्याने तिचा मान ठेवला जाईल. त्यासाठी आमची तयारीही सुरू झाली आहे - नसीम खान, प्रचारप्रमुख, कॉंगेस.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com