...तर तुमचीही खिचडी शिजवू : उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

तुम्ही कुटुंबीयांवर येणार असाल, मुलाबाळांवर येणार असाल तर आमच्या अंगावर येणाऱयांना ज्यांना ज्यांना कुटुंब आणि मुलंबाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदूळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू शकतो,अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांना इशारा दिला
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

मुंबई : ''मी मागेही म्हटलं होतं की मी शांत आहे, संयमी आहे. पण याचा अर्थ मी काही नामर्द नाही आणि ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या कुटुंबीयांवर हल्ले सुरू झाले आहेत ही पद्धत निदान महाराष्ट्राची तरी नाही. नक्कीच नाही. तुम्ही कुटुंबीयांवर येणार असाल, मुलाबाळांवर येणार असाल तर आमच्या अंगावर येणाऱयांना ज्यांना ज्यांना कुटुंब आणि मुलंबाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदूळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू शकतो,'' अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांना इशारा दिला. 

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ईडी चौकशीवरुन राजकारण तापले आहे. दैनिक 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी याचा संदर्भ घेत भाजप नेत्यांना इशारा दिला आहे. 'सामना'चे कार्यकारी संपादक व शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली. या सगळ्याचा सरकार प्रतिकार करेल? असे विचारले असता ठाकरे म्हणाले, " सरकार काय, अख्खा महाराष्ट्र करेल. कारण महाराष्ट्रात हा असला विचार कधीच रुजलेला नाहीच. सूडाचा विचार शत्रूला पराभूत करणं हा आहे. पण या पद्धतीने कारण नसताना राजकीय शत्रूचा काटा काढणं ही संस्कृती नाही,"

"बंगाल आणि महाराष्ट्राला क्रांतिकारकांची एक परंपरा आहे. त्यामुळे क्रांती आणि पराक्रम या मातीतच जन्माला येतो. महाराष्ट्राला आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र का म्हणतो! अन्याय, किंबहुना हे उपरे जे अंगावर येतात, आक्रमक त्यांचा फडशा कसा पाडायचा ती शक्ती आणि प्रेरणा त्यांनी आपल्याला दिलेली आहे. म्हणून माझं म्हणणं असंच आहे की, राजकारण राजकारणासारखं करा. त्यात तुम्ही केवळ सत्तेचा दुरुपयोग करून अंगावर येणार असाल तर सत्ता सदासर्वकाळ कोणाकडे राहत नाही हे लक्षात ठेवा.  मागे त्यांच्याही बद्दल कसं सगळं चाललं होतं आणि त्याही केसेस कशा होत्या, काय होत्या हे आठवत असेलच. त्यावेळेला शिवसेनाप्रमुखांनी कसं त्यांना वाचवलं होतं याचं थोडं जरी भान त्यांना असेल, तर काळ कसा बदलू शकतो हे त्यांच्या लक्षात येईल,"

सीबीआयला राज्यात तपास करायचा असेल तर राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागेल, असा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. त्याबाबत विचारणा केली असता ठाकरे म्हणाले, "सीबीआयला वेसण का घातली? कारण तुम्ही सीबीआयचा दुरुपयोग करायला लागलात तेव्हा अशी वेसण घालावीच लागते. ईडी काय, सीबीआय काय त्यावर राज्याचा अधिकार नाही? आम्ही देतो ना नावं, आमच्याकडे आहेत नावं. मालमसाला तयार आहे. पूर्ण तयार आहे. पण सूडाने जायचं का? मग जनतेने आपल्याकडून काय अपेक्षा ठेवायची. सूडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा, आम्ही दहा सूड काढू,''
Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com