....त्यानंतर 'सामना'ने पुन्हा अग्रलेख लिहावा : बाळासाहेब थोरातांचा पलटवार (व्हिडिओ) - Balasaheb Thorat Answers Sanjay Raut's Editorial in Saamna | Politics Marathi News - Sarkarnama

....त्यानंतर 'सामना'ने पुन्हा अग्रलेख लिहावा : बाळासाहेब थोरातांचा पलटवार (व्हिडिओ)

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 16 जून 2020

काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे कधी कूस बदलायची याचा अनुभव त्यांना आहे, असे सांगत या दोन नेत्यांना अग्रलेखातून चिमटा काढण्यात आला आहे. त्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी उत्तर दिले आहे

मुंबई :  सामनाचा अग्रलेख अपूर्ण माहितीवर आहे. आम्ही महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न आहेत म्हणून मुख्यमंत्र्यांची भेट मागतो आहोत. आम्ही आघाडी सोबत आहोत. 'त्यांनी' व्यवस्थित माहिती घेऊन लिहावं हीच आमची इच्छा आहे, असा पलटवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांन शिवसेना व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर केला आहे. 

राजकारण हे अखेरीस सत्तेसाठीच असते व सत्ता कोणाला नको असे नव्हे. उद्धव ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील असे नेते नाहीत. सगळ्या पक्षांना मंत्रीपदं मिळाली आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे. खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करू नये, असे सांगत शिवसेनेने आपल्या मुखपत्र सामनामधून माजी मुख्यमंत्री व सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना टोला लगावला आहे. त्यावर थोरात यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 

काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे कधी कूस बदलायची याचा अनुभव त्यांना आहे, असे सांगत या दोन नेत्यांना अग्रलेखातून चिमटा काढण्यात आला होता.

संबंधित लेख