आघाडीच्या कार्यकर्त्यांना उचकवण्याचे भाजपकडून कटकारस्थान; हसन मुश्रीफ  - BJP Instigating MahaVikasAghadi Supporters Allege Hassan Mushriff | Politics Marathi News - Sarkarnama

आघाडीच्या कार्यकर्त्यांना उचकवण्याचे भाजपकडून कटकारस्थान; हसन मुश्रीफ 

सुनील पाटील
रविवार, 13 सप्टेंबर 2020

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार भक्कम आहे. यासाठी हे सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपने काही अजेंडे तयार केले आहेत. त्या अजेंड्यानूसार त्यांना यश मिळत नाही. पहिला अजेंडा सुशांतसिंह रजपूत आत्महत्या की हत्या यावर चर्चा केली जात आहे. त्यानंतर अमली पदार्थ सेवनाचा विषय यामध्ये विनाकारण राज्य सरकार आणि गृह खात्याची बदनामी केली जात आहे, असा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला आहे

कोल्हापूर  : भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी विविध अजेंडे तयार केले आहेत. यामध्ये भाजपला यश आलेले नाही, त्यामुळे भाजप नेत्यांकडून कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना उचकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण महाविकास आघाडी भक्कम असून भाजपच्या असल्या कटकारस्थानापासून कार्यकर्त्यांनी सावध रहावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज व्यक्त केला. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी मुश्रीफ म्हणाले, ''राज्यात महाविकास आघाडीचे सरकार भक्कम आहे. यासाठी हे सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपने काही अजेंडे तयार केले आहेत. त्या अजेंड्यानूसार त्यांना यश मिळत नाही. पहिला अजेंडा सुशांतसिंह रजपूत आत्महत्या की हत्या यावर चर्चा केली जात आहे. त्यानंतर अमली पदार्थ सेवनाचा विषय यामध्ये विनाकारण राज्य सरकार आणि गृह खात्याची बदनामी केली जात आहे. भारतीय जनता पक्षाने बिहारमध्ये सुशांतसिंह बाबत 'हम ना भुलेंगे, ना भुलाने देंगे' अशा पध्दतीचे फलक लावले आहेत. सुशांतसिंह बिहारमध्ये त्याचे राजकारण केले जात आहे,''

मुश्रीफ पुढे म्हणाले, ''लोकसभेचे काँग्रेसचे नेते अधिरंजन चौधरी म्हणतात की रिया चक्रवर्ती पश्‍चिम बंगालची आहे. त्यांचे वडिल सैन्यात होते. एका बाजूला सुशांतसिंह बिहारचा आणि रिया चक्रवर्ती पश्‍चिम बंगालची या दोन्ही राज्यात निवडणूक सुरु आहे. या दोन्ही राज्यातील राजकारणामध्ये महाराष्ट्राची बदनामी का करण्याचे कट कारस्थान केले जात आहे. याशिवाय, मुंबई पाकव्याप्त काश्‍मिर आहे. मुंबई पोलीस बिनकामाचे आहेत. माझे संरक्षण करु शकणार नाहीत, अशी वक्तव्ये करणे; मुख्यमंत्र्यांना रावणाच्या भूमिकेत दाखवणे, शरद पवार यांना धमकी हे सर्व उचकविण्याचा प्रयत्न करत आहेत,''

श्‍वेतपत्रिकेची विनंती करणार
बिहारमध्ये भाषण करताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य शासनाची दहशत असा उल्लेख केला आहे. हे ऐकूण धक्का बसला. वास्तविक २८ नोव्हेंबरला महाविकास आघाडीला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना आणि आता महाविकास आघाडीचे सरकार असताना कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती होती. याबाबत श्‍वेतपपत्रिका काढण्याची विनंती आपण गृहमंत्र्यांना करणार आहोत,"

मी कामगारमंत्री असताना बांधकाम कामगार मंडळ स्थापन केले होते. यामध्ये हजारो कोटी रुपये जमा झाले होते. माजी मुख्यमंत्र्यांनी या मंडळाच्या 302 कलमाखाली आरोपी म्हणून एक वर्ष फरार होता त्याची निवड केली होती. तरीही त्याची चौकशी झाली नाही. नाही. त्यामुळे त्याचीही चौकशी झाली पाहिजे, असेही मुश्रीफ म्हणाले.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख