काँग्रेसने स्वतःचे चारित्र्य पहावे : बिहार निवडणुकीवरुन आंबेडकरांचा टोला - Prakash Ambedkar Analysis on Bihar Elections | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.

काँग्रेसने स्वतःचे चारित्र्य पहावे : बिहार निवडणुकीवरुन आंबेडकरांचा टोला

अॅड. जयेश गावंडे
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

बिहारच्या निवडणुकीत डेमाॅक्रेटिक फ्रंटने मते खाल्ली असा काँग्रेसचा आरोप असेल तर आधी त्यांनी स्वतःचे चारित्र्य पहावे, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे. १९९० मध्ये मिलीजुली सरकारची जी पद्धत आली ती पुन्हा सुरु होते आहे, असाही दावा त्यांनी केला.

अकोला : बिहारच्या निवडणुकीत डेमाॅक्रेटिक फ्रंटने मते खाल्ली असा काँग्रेसचा आरोप असेल तर आधी त्यांनी स्वतःचे चारित्र्य पहावे, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे. १९९० मध्ये मिलीजुली सरकारची जी पद्धत आली ती पुन्हा सुरु होते आहे, असाही दावा त्यांनी केला.

बिहार निवडणुकीत भाजप - जेडीयूच्या एनडीएला मोठे यश मिळाले आहे. बिहारमध्ये काँग्रेसचा धुव्वा उडाला आहे. याबाबत आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "एमआयएम- डेमाॅक्रेटिक फ्रंट ने मते खाल्ली असे काँग्रेसचे म्हणणे असेल तर मते खाण्याची ही बाब राष्ट्रीय जनता दलालाही लागू होते. त्यांना लागू होत नसेल तर मग इतरांबाबत काँग्रेसने बोलू नये. गेल्या सभागृहात काँग्रेसचे ३३ सदस्य होते. आता ही संख्या २० वर आली आहे. त्यामुळे काँग्रेसने आपले चारित्र्य पहावे," 

आंबेडकर पुढे म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू आणि इमेज चालली नाही, हे बिहारच्या निवडणुकीवरुन दिसते आहे. अन्य राज्यांत या आधी जे यश मिळाले ते बिहारच्या निवडणुकीत झालेले नाही.  चिराग पासवान यांच्यामुळे जेडीयूला किती परिणाम झाला हे मतांची आकडेवारी आल्यावर बोलता येईल. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक याचिकांच्या सुनावणीसाठी स्वतंत्र न्यायालय नेमण्यास सांगितले आहे.  अनेक ठिकाणी उमेदवारांनी आपल्यावरच्या गुन्ह्यांबाबतची प्रतिज्ञापत्रे सादर केलेली नाही. त्यांच्यावर निवडणूक आयोग कारवाई करणार का हा प्रश्न आहे,"

पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्येही डेमाॅक्रेटिक फ्रंटचा प्रयोग करणार का या प्रश्नावर ते म्हणाले की, प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे त्या त्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागेल. बिहारमध्ये डेमाॅक्रेटिक फ्रंटला मते मिळाली पण यश मिळाले नाही, ही वस्तुस्थिती आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख