#VikasDubeyEncounter : उत्तर प्रदेशचे सरकार पलटी होण्यापासून वाचले : अखिलेश यादव - UP Ex CM Akhilesh Yadav Reacts on Vikas Dubey Encounter | Politics Marathi News - Sarkarnama

#VikasDubeyEncounter : उत्तर प्रदेशचे सरकार पलटी होण्यापासून वाचले : अखिलेश यादव

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 जुलै 2020

उत्तर प्रदेशात ८ पोलिसांची हत्या करुन फरारी झालेला व काल उज्जैनमध्ये पकडला गेलेला गँगस्टर विकास आज सकाळी कानपूरजवळ झालेल्या चकमकीत ठार झाला आहे. या एनकाऊंटर बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे

लखनौ : विकास दुबे मारला गेल्यामुळे उत्तर प्रदेशचे सरकार पलटण्यापासून वाचले, अशी प्रतिक्रिया या राज्याचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी व्यक्त केली आहे. दुबेला घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या ताफ्यातली मोटार पलटल्यानंतर विकास दुबेचा एनकाऊंटर झाला, असा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला आहे. त्याला उद्देशून यादव यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

एका गुन्हेगाराचा अंत झाला. पण त्याचे गुन्हे आणि त्यांना संरक्षण देणाऱ्यांचा काय, असा प्रश्न विचारत काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी विकास दुबे एनकाऊंटर प्रकरणावर संशय व्यक्त केला आहे. दुबे सकाळी पोलिसांच्या चकमकीत मारला गेल्यानंतर काही वेळातच प्रियंका यांनी या प्रकरणाबाबत सवाल उपस्थित केला आहे. 

उत्तर प्रदेशात ८ पोलिसांची हत्या करुन फरारी झालेला व काल उज्जैनमध्ये पकडला गेलेला गँगस्टर विकास आज सकाळी कानपूरजवळ झालेल्या चकमकीत ठार झाला आहे. उज्जैनहून त्याला घेऊन येणाऱ्या पोलिस वाहनांच्या ताफ्यातली एक मोटार उलटली. त्यावेळी विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत पोलिसांनी त्याला ठार केले.

पोलिसाचे पिस्तूल हिसकावल्याचा दावा

उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे आठ पोलिसांची हत्या करणारा गुन्हेगार विकास दुबे याला मध्यप्रदेशातील उज्जैन येथून काल  सकाळी अटक करण्यात आली होती. उत्तरप्रदेश पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी दहा पथके तयार केली होती. गेल्या आठ दिवसांतील अनेक घडामोडींनंतर विकास दुबे अखेर मध्यप्रदेश पोलिसांच्या हाती लागला होता. एका पोलिसाचे पिस्तुल हिसकावून विकास दुबेने पळण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला आहे. 

पळून जाण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी घातल्या गोळ्या

आज सकाळी त्याला घेऊन येणाऱ्या वाहनांच्या ताफ्यातली एक जीप उलटली. त्यावेळी विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला शरण येण्याचे आवाहन केले. त्यावेळी चकमक घडली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात तो मरण पावल्याचे जाहीर करण्यात आले.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख