अयोध्या निकाल तथ्य, पुराव्यांवर नाही तर भावनांवर : प्रकाश आंबेडकर (व्हिडिओ) - Ayodhya Verdict Based on Emotions Say Prakash Ambedkar | Politics Marathi News - Sarkarnama

अयोध्या निकाल तथ्य, पुराव्यांवर नाही तर भावनांवर : प्रकाश आंबेडकर (व्हिडिओ)

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

पुरावे व इतिहासाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर अयोध्या हे बौद्धांचे सांस्कृतिक शहर होते. मात्र निकाल हा तथ्यांवर नसून भावनिकतेवर देण्यात आल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.दिक धर्म मानणारे लोक हे दुसऱ्या धर्मावर अतिक्रमण करीत आहेत हे आता आयोध्येत होत आहे, असेही ते म्हणाले

अकोला : जगात भारतीयांकडे संशयीत नजरेने पाहिले जाते. मात्र, याबाबत कोणीही भारतीय स्वतःला विचारत नाही की आमच्यावर अत्याचार झालेले असताना आता जगही आमच्यावर अत्याचार करीत आहे. मात्र हे सत्य आहे कि वैदिक धर्म मानणारे लोक हे दुसऱ्या धर्मावर अतिक्रमण करीत आहेत हे आता आयोध्येत होत आहे,'' असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले.

पुरावे व इतिहासाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर अयोध्या हे बौद्धांचे सांस्कृतिक शहर होते. मात्र निकाल हा तथ्यांवर नसून भावनिकतेवर देण्यात आल्याचा दावा आंबेडकर यांनी यावेळी केला. ते म्हणाले, ''राहुल संस्कृती हे इतिहासकार आहेत. त्यांनी सांगितले की, अयोध्या ही बौद्ध सांस्कृतिक तसेच बौद्धांचे ज्ञानाचे केंद्र होते. अलाहाबाद ( प्रयागराज ) उच्च न्यायालयात प्रकरण गेले तेव्हा हा निकाल तथ्यांवर नाही तर भावनांवर झाला. परिणामी निकाल राम मंदिराच्या बाजूने लागला. सर्वोच्च न्यायालयातही इतिहासाला व पुराव्यांना ग्राहय धरले नाही, यातून एक मार्ग काढला जात आहे असे सांगत राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला,''

आंबेडकर पुढे म्हणाले, ''अलाहाबाद न्यायालयाने हे मान्य केले असते की अयोध्या ही पूर्वी साकेत नावाने ओळखली जात होती. या ठिकाणी केलेल्या खोदकामात जे सापडले ते बौद्ध अवशेष आहेत, तर चित्र वेगळे असते. मात्र सध्याची परिस्थिती पाहता राम मंदिर निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही राम मंदिराच्या बाजूने निकाल देतो, असे स्पष्ट न्यायालयाने सांगितले असते तर भारतीयांकडे ज्या संशयीत नजरेने पाहिले जाते तो संशय दूर झाला असता. कारण भारतीय आता आपल्याशी खरे बोलायला लागले आहे, असा निकाल त्या ठिकाणी लागला असता. मात्र आताचा निकाल पाहता आजही भारतीयांकडे संशयित नजरेने पाहिले जाईल,'' 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख