नाशिक जिल्हा वय वर्षे 151, `हे` होते पहिले जिल्हाधिकारी

जिल्ह्याच्या स्थापनेच 151 वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्त आगामी वर्षभर नाशिक `वन फिफ्टी वन` कार्यक्रम होणार आहे. यामध्ये सर्वच क्षेत्रातील महत्वाची मंडळी कदाचित पहिल्यांदाच एखाद्या कार्यक्रमासाठी एका छत्राखाली येण्याचाही दुर्मिळ योग या निमित्ताने साधला जात आहे,
नाशिक जिल्हा वय वर्षे 151, `हे` होते पहिले जिल्हाधिकारी
Nashik collectorate

नाशिक : जिल्ह्याच्या स्थापनेच 151 वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्त आगामी वर्षभर नाशिक `वन फिफ्टी वन` कार्यक्रम होणार आहे. यामध्ये सर्वच क्षेत्रातील महत्वाची मंडळी कदाचित पहिल्यांदाच एखाद्या कार्यक्रमासाठी एका छत्राखाली येण्याचाही दुर्मिळ योग या निमित्ताने साधला जात आहे, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.  

जिल्हा स्थापनेस 151 वर्ष पुर्ण होत आहेत. इतिहास, भूगोल, शास्त्र, भाषा, कृषी, उद्योग या सर्वच  विषयांत वास्तविकतेत आपला स्वतःचा उच्चतम दर्जा निर्माण करून एक वेगळे उदाहरण जिल्ह्याच्या रुपाने जगासमोर उभे आहे. प्रभू रामचंद्रांपासून ते ब्रिटिश शासनापर्यंतचा इतिहास, चार अॅग्रोक्लायमेटिक झोन्स असलेला जिल्हा, साहित्याचे मेरूमणी असलेले कुसुमाग्रज, वसंत कानेटकर यांसारख्या प्रभुती, संगीताची परिभाषा निश्चित करणारे पंडित विष्णू दिगंबर पलुसकर, बॉलिवूडचा पाया घालणारे दादासाहेब फाळके, देश रक्षणासाठी अहर्निश सेवेत असलेले आर्टिलरी सेंटर आणि नोटांचा कारखाना अशा अनेक वैशिष्ठ्यांचा यानिमित्ताने उल्लेख करता येईल.  

हे होते पहिले जिल्हाधिकारी  
नाशिक जिल्हा निर्मिती 1869 मध्ये झाली. सी.आर. ओव्हन्स हे नाशिकचे पहिले जिल्हाधिकारी होते. 1947 मध्ये एम.जी. पिम्पुटकर हे पहिले मराठी जिल्हाधिकारी या जिल्ह्याला लाभले.  इतिहासाच्या अनेक वळणावरून पुढे जात असताना आणि प्रगतीचे विविध टप्पे पार करताना जिल्ह्याने आपली वेगळी ओळख राज्य आणि देशात निर्माण केली आहे. ही वाटचाल स्मरणीय होण्यासाठी हे वर्ष उत्साहात साजरे केले जाणार आहे. प्रशासन विशेष पुढाकार घेऊन जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांना एका मंचावर आणणार आहे. 

कोरोनाला हरवले
हा सोहळा वैशिष्ट्यपुर्णरितीने साजरा करण्यासाठी शासनाने मौलिक सुचना केल्या. या सुचनांचा आधार घेऊन वर्षभरात घ्यावयाच्या कार्यक्रमाची रुपरेषा तयार करण्यात आली आहे. परंतु कार्यवाही सुरू करण्यापूर्वीच संपूर्ण जगाला अभूतपूर्व अशा कोरोना महामारीने ग्रासले व आपले मागचे संपूर्ण वर्ष त्यात गेले. आपल्या अंगभूत लढाऊ बाण्याने आपण या महामारीला हरवून आज जवळपास सुरक्षित वातावरणात प्रवेश केलेला आहे. आता आपल्याला हा कार्यक्रम पुढे घेऊन जायचा आहे. 
शासनाकडून 25 कोटी

या कार्यक्रमास सहकार्य करण्याचे आश्वासन मा. उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजन मंत्री श्री.अजित पवार यांनी नाशिक भेटीदरम्यान दिले होते, ते आज राज्याची आर्थिक परिस्थिती आव्हानात्मक असताना देखील 25 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करून त्यांनी पूर्ण केले आहे. 

हायस्पीड रेल्वे आणि ड्रायपोर्ट
नाशिक वन फिफ्टी वन हा केवळ एका वेळेचा उत्सव नसून त्यामधून अत्यंत दूरगामी उपयोगी ठरतील असे अनेकविध उपक्रम घेणे हा खरा आपला उद्देश आहे. जिल्ह्यामध्ये आता सुरत चेन्नई महामार्ग, समृद्धी महामार्ग, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे, ड्रायपोर्ट असे अनेकविध राष्ट्रीय महत्त्वाचे प्रकल्प कार्यान्वित होणार आहेत. त्या प्रकल्पाचा लाभ जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील व्यक्तीला होऊ द्यायचा असेल तर आपल्याला सुद्धा जिल्हा त्यादृष्टीने तयार करावा लागेल. अनेक उपक्रम हाती घ्यावे लागतील.

जिल्हा नियोजन समिती मार्फत तर प्रत्येक योजनेचा लाभ योग्य प्रकारे तळागाळापर्यंत पोहोचेल याची काळजी घेतली जाणारच आहे, परंतु त्याबरोबर नाशिक वन फिफ्टी वन या कार्यक्रमाच्या छत्राखाली अनेक कामे घेऊन त्याची योग्य ती जोड या सर्व योजनांना देणेसुद्धा आवश्यक आहे.

हा कार्यक्रम मालेगाव ते पेठ आणि सटाणा ते सिन्नर असा संपूर्ण जिल्ह्याचा कार्यक्रम असून नाशिक जिल्ह्याचे चार स्वभाविक विभाग पडतात जसे की सुरगाणा पेठ सारखा आदिवासी बहुल विभाग, कसमादे पट्टा, नाशिक व लगतच्या भाग आणि मालेगाव मधील मुस्लिम बहुल भाग या सर्वांना या कार्यक्रमांमध्ये सामावून घेऊन त्या त्या ठिकाणची शक्तिस्थळे हायलाईट केली जातील.

...
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in