आमदार माणिकराव कोकाटेंच्या पॅनेलचा सख्ख्या भावाकडून पराभव - MLA Manikrao Kokate`s Panel defet by Brother Bharat. Nashik politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

आमदार माणिकराव कोकाटेंच्या पॅनेलचा सख्ख्या भावाकडून पराभव

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 18 जानेवारी 2021

राष्ट्रवादी कॅाग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या पॅनेलचा सोमंठाणे (सिन्नर) ग्रामपंचायत मोठा धक्का बसला. आमदार कोकाटेच्या पॅनेलचे त्यांचे बंधु भरत शिवाजीराव कोकाटे यांनी सात जागा जिंकून पराभव केला. हा कोकाटे यांना त्यांच्या घरातूनच बसलेला मोठा राजकीय धक्का मानला जातो. 

सिन्नर :  राष्ट्रवादी कॅाग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या पॅनेलचा सोमंठाणे (सिन्नर) ग्रामपंचायत मोठा धक्का बसला. आमदार कोकाटेच्या पॅनेलचे त्यांचे बंधु भरत शिवाजीराव कोकाटे यांनी सात जागा जिंकून पराभव केला. हा कोकाटे यांना त्यांच्या घरातूनच बसलेला मोठा राजकीय धक्का मानला जातो. 

सोमठाणे ग्रामपंचायत निवडणूकीत आमदार कोकाटे यांच्या विरोधात त्यांचे संख्खे बंधु भरत शिवाजीराव कोकाटे यांच्या पॅनेलचे आव्हान होते. आज झालेल्या मतमोजणीत भरत कोकाटे यांच्या पॅनेलला अकरा पैकी सात जागा मिळाल्या. आमदार कोकाटे यांच्या पॅनेलला फक्त चार जागा मिळाल्या. आमदार कोकाटे यांच्या राजकारणाला त्यांच्या घरातूनच धक्का बसला. कोकाटे यांच्या राजकारणाला गावातूनच मिळालेली नापंसती चर्चेचा विषय आहे. आमदार कोकाटे तालुक्याचे राजकारण करीत असल्याने त्यांच्या राजकारणावर त्याचा थेट परिणाम होणार नाही. मात्र घरातच घरच्यांनी त्यांच्या घरच्यांनीच नाकारले असा संदेश गेला आहे. 

आज सकाळी सिन्नर तहसीलदार कार्यालयात मतमोजणी झाली. त्यावेळी मोठी गर्दी होती. निकाल जाहीर झाल्यावर भरत कोकाटे यांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. तर गावात त्यांची व विजयी उमेदवारांची मिरवणीक काढण्यात आली. भरत कोकाटे यांच्या पॅनेलचे विजयी उमेदवार असे, भरत शिवाजीराव कोकाटे, मंगल साहेबराव कोकाटे, सुनिता दयाराम कोकाटे, संदीप कुंडलीक धोकरट, मंगल संजय धोकरट, जयश्री जालींदर कोकाटे आणि मिना मधुकर माळी यांची बिनविरोध निवड झाली. आमदार कोकाटे यांच्या पॅनेलचे महेंद्र भाऊराव कोकाटे, साहेबराव भास्कर साळवे, विकास अर्जुन माळी, सरस्वती सुनिता धोकरट.
....    

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख