शरद पवार म्हणतात, "मंत्रालय परिसरात एवढा पाऊस कधी पाहिलेला नाही..." 

यशवंतराव चव्हाण सेंटरमधून शरद पवार, सुप्रिया सुळे परत येत असताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.
rain.jpeg
rain.jpeg

मुंबई : राज्यभर सध्या पाऊस सुरू आहे. मुंबईत बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झाली. ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. राज्यातील सद्यस्थिती, आर्थिक, सामाजिक घडामोडींचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. 

बैठकीनंतर शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे या परत येत असताना जोरदार पाऊस सुरू होता. रस्त्यांवर सर्वत्र पाणी साचले होते. या रस्त्यांतून वाट काढीत असतानांचा व्हिडिओ सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबूकवरून शेअर केला आहे. त्यांनी मुंबईतील पावसाची ही घटना आपल्या फेसबूकवरून लाईव्ह केली. यशवंतराव चव्हाण सेंटरमधून शरद पवार, सुप्रिया सुळे परत येत असताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. 

मंत्रालय परिसरात पाणी साचल्याचे दिसत आहे. "मी आयुष्यात पहिल्यांदा या परिसरात एवढं पाणी तुंबलेलं पाहतो आहे," अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. तर या परिसरात एवढं पाणी तुंबलेले कधी पाहिले नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. मुंबईकरांनो, काळजी घ्या, असे आवाहन सुळे यांनी केले आहे. 

सध्या मुंबईत सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. नरिमन पॉईंट, मरिन ड्राईव्ह, चर्नी रोड, हिंदमाता, किंग्ज सर्कल, सायन परिसरातही पाणी साचले आहे. अनेक नागरिक अडकले आहेत. हवामान विभागाकडून मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरसह उत्तर कोकणात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई महापालिका, पोलिस प्रशासनाने नागरिकांनी कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नका, असे आवाहन केले आहे. 

हेही वाचा : 'या' साठी दिला होता २०१४ मध्ये भाजपला पाठिंबा : शरद पवार
 
मुंबई : भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्यात फूट पाडण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसने २०१४ मध्ये भाजपला पाठिंबा दिला होता असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. मुंबई मिरर या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पवार यांनी ही माहिती दिली. "२०१९ मध्ये महाराष्ट्रात जी महाविकास आघाडी जन्माला आली त्याची बीजे २०१४ मध्येच रोवली गेली होती. त्यावेळी भाजपला पाठिंबा देण्यामागे भाजप व सेनेत फूट पाडण्याचा हेतू होता. भाजपचे सरकार त्यावेळी स्थापन झाल्यानंतर तब्बल चार महिन्यांनी शिवसेना सत्तेत सहभागी झाली होती,'' असे पवार यांनी या मुलाखतीत सांगितले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com