आता तालुकास्तरावर दर ३ महिन्यांनी होणार सरपंच सभा - Sarpanch Meeting will be held on Tehsil level Infomes Hassan Mushriff | Politics Marathi News - Sarkarnama

आता तालुकास्तरावर दर ३ महिन्यांनी होणार सरपंच सभा

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

तालुका स्तरावर दर तीन महिन्यांनी सरपंच सभा घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. जनतेच्या समस्या सोडविणे तसेच गावांमधील विकासकामे गतिमान करण्याच्या दृष्टीने होणार कार्यवाही होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मुंबई : तालुका स्तरावर दर तीन महिन्यांनी सरपंच सभा घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. जनतेच्या समस्या सोडविणे तसेच गावांमधील विकासकामे गतिमान करण्याच्या दृष्टीने होणार कार्यवाही होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

गटविकास अधिकारी यांनी सभा घेतल्यानंतर कार्यालयीन कामकाजाच्या पाच दिवसात सभेचा  अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करावा, असा आदेश संबंधितांना देण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील अहवाल एकत्र करून ते संबंधित विभागीय आयुक्त यांना सात दिवसात तर त्यानंतर विभागीय आयुक्त यांनी जिल्ह्यातून आलेले अनुपालन अहवाल शासनास दहा दिवसात सादर करावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

या अहवालाची शासन स्तरावर दखल घेण्यात येईल. सर्व जिल्ह्यांनी हा उपक्रम प्रभावीपणे राबवून गावांमधील नागरी समस्यांची सोडवणूक करावी, असे आवाहन मंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले आहे. राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. आता गावोगावी सरपंच -उपसरपंच निवडीची प्रक्रियाही सुरु आहे. 

तालुक्यातील सरपंचांमध्ये गाव पातळ्यांवरील विकासाबाबत समन्वय रहावा आणि नागरिकांच्या समस्या वेगाने सुटाव्यात यासाठी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख