minister gulabrao patil announced five day week for jeevan pradhikaran | Sarkarnama

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 30 जून 2020

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील ज्या सेवा अत्यावश्यक म्हणून समजल्या जातात अशा पाणीपुरवठा केंद्रावरील नियमित आस्थापना, रूपांतरित स्थायी/अस्थायी आस्थापना आस्थापना, कार्यव्ययी आस्थापना, रोजंदारीवरील आस्थापना, सफाई कामगार यांना हा आदेश लागू राहणार नाही.

मुंबई : राज्य शासनाने 24 फेब्रुवारी 2020 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करून सर्व शनिवार व रविवार हे सुट्टीचे दिवस ठरवण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर येत्या 4 जुलै 2020 पासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना देखील पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला असल्याची माहिती, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

याबाबतचा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील ज्या सेवा अत्यावश्यक म्हणून समजल्या जातात अशा पाणीपुरवठा केंद्रावरील नियमित आस्थापना, रूपांतरित स्थायी/अस्थायी आस्थापना आस्थापना, कार्यव्ययी आस्थापना, रोजंदारीवरील आस्थापना, सफाई कामगार यांना हा आदेश लागू राहणार नाही.

शासनाच्या नगरविकास विभागाने 21 जानेवारी 1984 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना नागरी सेवा नियम लागू करण्यात आले आहेत. तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने 23 मार्च 2017 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम व शासनातर्फे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील राज्य कर्मचारी संघटनेच्या वतीने कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याची मागणी, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचेकडे केली होती. या मागणीचा सहानुभूतीपुर्वक विचार करून विभागाने व शासनाने ही मागणी मान्य केली व कर्मचारी हिताचा निर्णय घेतला असल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.   या निर्णयानुसार  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सर्व कार्यालयांची कामकाजाची वेळ 45 मिनिटांनी वाढवण्यात आली असून येत्या 4 जुलैपासुन कामकाजाची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत राहणार आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनमध्ये दुसऱ्यांदा मुंबईबाहेर

पुणे: कोरोना महामारीच्या संकटामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईत थांबूनच संपुर्ण परिस्थिती हाताळत आहेत. चक्रिवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते काही तास अलिबागजवळ आले होते. आज आषाढी वारीच्या महापूजेसाठी ते दुसऱ्यांदा मुंबईबाहेर पडत आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर तीन महिन्यातच राज्यात कोरोनाचे संकट आले. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात पुण्यात दोन रूग्ण आढळले. त्याचा परिणाम म्हणून विधीमंडळाचे अधिवेशन लगेचच गुंडाळण्यात आले. आरोग्य यंत्रणेची सज्जता करण्याबरोबरच प्रस्तावित लॉकड़ाऊनवर सरकारला काम करावे लागले.  मुख्यमंत्र्यांनी 23 मार्चपासून राज्यात लॉकडाऊन लागू केला.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख