पाकिस्तानी हॅकर्सने भारताच्या आरोग्य सेतू एपची खोटी प्रत बनवली: गृहमंत्री

यासंदर्भात हल्लीच एक माहिती प्रकाशात आली होती, ज्यामध्ये प्रख्यात जर्मन कंपनी Mont Blanc यांचे हुबेहूब संकेतस्थळ बनवले गेले.
maharashtra home minister anil deshmukh on cyber crime cases
maharashtra home minister anil deshmukh on cyber crime cases

मुंबई: इंटरनेट हे माहिती मिळविण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असून त्याचा उपयोग ज्ञान, व्यवसाय वृद्धीसाठी करावा. कोणाच्या धार्मिक भावना दुखविण्यास अथवा समाजातील शांती आणि एकता बिघडवायला यांचा दुरुपयोग करू नये, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

सायबर गुन्ह्यांबाबत त्यांनी म्हटले आहे की, सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. अंदाजे 40 कोटी भारतीय इंटरनेटचा वापर करतात. लाँकडाऊनच्या काळात हा वापर व्यावसायिक कारणांसाठी होणे स्वाभाविक आहे, उदाहरणार्थ वर्क फ्रॉम होम, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग, सर्फींग इत्यादीसाठी, त्याव्यतिरिक्त इंटरनेटचा वापर मनोरंजनासाठी अर्थात सिनेमा किंवा वेबसिरीज बघण्यासाठी सुद्धा होत आहे. इंटरनेटचा वापर ऑनलाईन पेमेंट व ई-कॉमर्ससाठी खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. इंटरनेटच्या या वाढत्या उपयोगामुळे सायबर क्रिमीनल व हॅकर्स सामान्य लोकांना फसवण्यासाठी व त्यांना लुटण्यासाठी नवीन क्लृप्त्या लढवत असतात. 

यासंदर्भात हल्लीच एक माहिती प्रकाशात आली होती, ज्यामध्ये प्रख्यात जर्मन कंपनी Mont Blanc यांचे हुबेहूब संकेतस्थळ बनवले गेले. यावर महागड्या वस्तूंची खरेदी अगदी कमी किमतीत करता येईल असे अमिष ग्राहकांना दाखवले गेले. बरीच लोकं यात फसले व त्यांना वस्तू तर मिळाल्या नाहीतच, त्यांचे पैसे सुद्धा गेले. महाराष्ट्र सायबर विभाग, लोकांना अशा फसव्या वेबसाईटस ओळखण्यात मदत करते आणि अशा संकेतस्थळापासून सावधान राहण्यास वेळोवेळी सूचना सुद्धा देतो. अशा प्रकारच्या खोट्या पण हूबेहूब दिसणाऱ्या संकेतस्थळांमार्फत फसवणूक करण्याच्या पद्धतीला Phishing Attack असे म्हणतात.

हॅकर्स पासून सावधान

काही दिवसांपूर्वी, पाकिस्तानी हॅकर्सने भारताच्या आरोग्य सेतू अॅपची खोटी प्रत बनवून आपल्या देशातल्या सरकारी अधिकारी व आर्मीच्या अधिकाऱ्यांना त्याची लिंक पाठवली, व त्यांना ते एप डाऊनलोड करण्यास सांगितले. मुळात हे एप नसून एक virus program आहे जो फोन मधील आर्थिक, वैयक्तिक आणि गोपनीय सरकारी माहिती अशा प्रकारे संपूर्ण डाटा चोरू शकतो. महाराष्ट्र सायबर विभागाने जनतेला सूचना दिल्या आहेत की अनोळखी लिंक मधून एप डाऊनलोड करू नये व अँप गुगल व अॅपल यांच्या अधिकृत प्लेस्टोर वरूनच डाऊनलोड करावे.

महाराष्ट्र सायबर विभागाने चाईल्ड पोर्नोग्राफी सारखे गंभीर सायबर गुन्हे, महाराष्ट्रात थांबवण्याकरिता जवळजवळ १३६ गुन्हे दाखल केले. यात ४० हुन अधिक सायबर-गुन्हेगारांना अटक केली.

यात महाराष्ट्र सायबरचा हेतू असा आहे की, समाजाला अशा गंभीर गुन्ह्यांपासून मुक्त करून, समाजातील लहान मुलांचे यौन शोषण (sexual exploitation ) पासून संरक्षण करता येईल. महाराष्ट्र सायबर विभाग हा  चाईल्ड पोर्नोग्राफी विरुद्ध "Operation Blackface " नावाची एक प्रशंसनीय मोहीम सध्या राबवत आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com