corona cure rate increased Maharashtra health minister says | Sarkarnama

कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५ टक्क्यांवर : आरोग्यमंत्री

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 8 जुलै 2020

राज्यात आज १९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२२ टक्के एवढा आहे.  

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या ४६३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख २३ हजार १९२ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ५५.०६ टक्के एवढे झाले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ६६०३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ९१ हजार ६५ रुग्णांवर (एक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ११ लाख  ९१ हजार ५४९ नमुन्यांपैकी २ लाख २३ ७२४ नमुने पॉझिटिव्ह (१८.७७ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ३८ हजार  ७६२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४७ हजार ७२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२२ टक्के एवढा आहे.  राज्यात नोंद झालेले १९८ मृत्यू हे मुंबई मनपा-६२, ठाणे-२८, नवी मुंबई मनपा-८, पालघर-३, रायगड-३, पनवेल मनपा-३, नाशिक मनपा-५, अहमदनगर-१, जळगाव-८, जळगाव मनपा-२, पुणे-४, पुणे मनपा-२७, पिंपरी-चिंचवड मनपा-५,सोलापूर मनपा-८, सातारा-८, कोल्हापूर-३, सांगली-मिरज-कुपवाड मनपा-२, औरंगाबाद-३, औरंगाबाद मनपा-५,जालना-३, बीड-१, नांदेड-२, अकोला मनपा-२, यवतमाळ-१, नागपूर मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

रत्नागिरीतला लॉकडाऊन वाढवला  

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी 'मिशन ब्रेक द चेन' अंतर्गत 15 जुलैपर्यंत लॉकडाउनची मुदत वाढविण्यात आली आहे. या कालावधीत पूर्वीच्या लागू असलेले निर्बंध पुढील आठवडाभर लागू राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणत होऊ लागला आहे. ब्रेक द चेन या मिशनअंतर्गत जिल्ह्यात 1 ते 8 जुलै या कालावधीत कडक लॉकडाउन करण्यात आले, मात्र या काळात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. 25, 32, 40, 56 असे रुग्ण सापडले. आज जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 813 वर गेली आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना कोणताही प्रवासाचा इतिहास नसतानाही जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढू लागली आहे. आठ दिवसांनंतर पुन्हा एकदा परिस्थिती पाहून लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत निर्णय होणार होता. त्यानुसार आज आठ दिवस पूर्ण होत असताना कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत नसल्याने जिल्हा प्रशासनाने आणखी एक आठवडा म्हणजे 15 जुलैपर्यंत लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख