साखर कारखाने, जिल्हा बॅंकांसह दूध संघांच्या निवडणुका टप्याटप्याने होणार 

सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलणे शक्‍य नाही.
Elections of sugar mills, district banks and dudh sanghs will be held in phases
Elections of sugar mills, district banks and dudh sanghs will be held in phases

कोल्हापूर : राज्यातील जिल्हा दूध संघ, जिल्हा सहकारी बॅंकांसह साखर कारखान्याच्या निवडणुका घेण्याचे नियोजन सहकार विभागामार्फत सुरू आहे. या निवडणुका घेण्याबाबतचा नवा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येईल, अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. 

सहकारी संस्थांच्या निवडणुकांना 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ दिल्याची बातमी आज काही दूरचित्रवाणीवर दाखवण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्या वेळी त्यांनी वरील उत्तर दिले. 

पाटील म्हणाले,"यापूर्वी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर 31 डिसेंबर 2020 पर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुकींना स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सात जिल्हा बॅंकांसह काही साखर कारखाने अशा 38 संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. आता उर्वरित संस्थांच्याही निवडणुका घ्याव्या लागतील. कारण, अनेक संस्थांच्या विद्यमान संचालकांची मुदत संपून बराच कालावधी झाला आहे. एकाचवेळी सर्व संस्थांच्या निवडणुका घेतल्या तर त्या तुलनेत यंत्रणा कमी पडेल, त्यामुळे जिल्हा दूध संघ असतील किंवा उर्वरित जिल्हा बॅंका, साखर कारखाने अशा मोठ्या संस्थांच्या निवडणुका घ्याव्याच लागतील.' 

ते म्हणाले,"महापालिकांसह इतर स्थानिक संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचबरोबर राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रियाही सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे. अशा परिस्थितीत फक्त सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलणे शक्‍य नाही. म्हणूनच मोठ्या संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबतचा फेरप्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत सहकार विभागाकडून सादर होईल. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर टप्प्याटप्प्याने संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातील. जेणेकरून यंत्रणेवर एकदम खूप ताण येणार नाही.'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com