गोपीचंद पडळकरांनी पहिला दिवस गाजविला.... - bjp mla Gopichand Padalkar agitation by playing drum in front of vidhan bhavan | Politics Marathi News - Sarkarnama

गोपीचंद पडळकरांनी पहिला दिवस गाजविला....

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 14 डिसेंबर 2020

हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस पडळकरांना गाजविला.

मुंबई : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास आज सुरवात झाली. विविध मागण्यांसाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज विधान भवनासमोर ढोल वाजवून आंदोलन केलं. पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला. हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस पडळकरांना गाजविला. पडळकरांच्या या आंदोलनाची विधानभवन परिसरात चर्चा होती. 

धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आमदार गोपीचंद पडळकर हे पारंपरिक वेषात विधानभवनात आले होते. त्यांना त्यामुळे प्रवेश नाकारला. त्या निषेधार्थ त्यांनी व आमदार सदाभाऊ खोत यांनी प्रवेशद्वारावर घोषणा देत ठिय्या धरला. त्यानंतर गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर त्यांना प्रवेश देण्यात आला.

धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार गंभीर नाही, असे पडळकर यांनी यावेळी सांगितले. हे सरकार भटक्या, विमुक्त जमातींच्या विरोधातील सरकार असल्याचा आरोप पडळकर यांनी यावेळी केला. पडळकर यांनी राज्य विधिमंडळाकडे विविध 16 मागण्या केल्या आहेत.  

आमदार पडळकर यांनी केलेल्या मागण्या

  1. धनगर आरक्षण न्यायालयीन खटला जलदगतीने कोर्टात चालवावा
  2. मेंढपाळ व वनपाल संघर्ष कमी करा. 
  3. नवी मुंबई, औरंगाबाद, पुणे, नाशिक, अमरावती येथे विद्यार्थी वसतीगृह कधी करणार?
  4. राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांकडून मेंढपाळांसाठी १० लाख रु. कर्ज द्या.
  5. अॅट्रॉसिटीच्या धर्तीवर मेंढपाळ हल्लाविरोधी कायदा करा.
  6. बार्टीच्या धर्तीवर भटक्या विमुक्तांसाठी आर्टी (ARTI)ची स्थापना करावी. 
  7. महाज्योती संस्थेस १०,००० कोटी निधी त्वरित उपलब्ध करा.
  8. बारा बलुतेदार महामंडळांना निधी उपलब्ध करून द्या.
  9. चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर यांचे वाफगावचा वाडा येथे सरकारने स्मारक करावे.

हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांचे तेव्हा चुकले का...?  

मुंबई : "मराठा आरक्षणावरून विरोधकांची ही घोषणाबाजी सुरू आहे. मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना म्हणाले होते 'न्यायालयात टिकेल असे आरक्षण आम्ही देऊ' मग फडणवीस तेव्हा चुकले का ?  केवळ राजकारणासाठी सर्व विषयाचा वापर करायचा एवढेच चालले आहे. आम्ही न्यायालयीन लढाई लढत आहोत," असे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज सांगितले. अशोक चव्हाण म्हणाले, "विरोधकांना काही विषय उरलेलेले नाही. मराठा समाजाचे आरक्षण मिळावे, असे त्यांना अजिबात वाटत नाही म्हणूनही असे राजकारण सुरू आहे. काहीही करायचे उचलली जीभ लावली टाळ्याला, अशी भूमिका विरोधकांची राहिलेली आहे."

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख