सातारा जम्बो हॉस्पीटलचा नेमका खर्च तरी किती? 

कोरोना काळात प्रशासनाने विविध उपाययोजना केल्याचे सांगितले. यात केंद्र सरकारच्या सुविधा, मदत किती मिळाली याचा उल्लेख का नाही?. साताऱ्याला जम्बो हॉस्पीटल उभारण्यात आले. मात्र त्यासाठी नेमका खर्च तरी किती आला,
Jaykumar Gore
Jaykumar Gore

मुंबई  : कोरोना काळात प्रशासनाने विविध उपाययोजना केल्याचे सांगितले. यात केंद्र सरकारच्या सुविधा, मदत किती मिळाली याचा उल्लेख का नाही?. साताऱ्याला जम्बो हॉस्पीटल उभारण्यात आले. मात्र त्यासाठी नेमका खर्च तरी किती आला, हे गेले दोन-तीन महिने आम्ही मागतो आहोत. मात्र त्याची माहिती मिळत नाही. कोरोना विषयक उपाययोजना व सुविधांवरील खर्चात भ्रष्टाचार होतो आहे. त्याची चौकशी केव्हा होणार, असा प्रश्‍न आमदार जयकुमार गोरे यांनी केला. 

अर्थसंकल्पीय विधीमंडळ अधिवेशनात आज राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु झाली. यावेळी आमदार गोरे म्हणाले, गेले दिड वर्षे देश आणि राज्य कोरोना विरोधात संघर्ष करतो आहे. राज्यपालांच्या अभिभाषणात जम्बो हॉस्पीटल, दवाखाने, मजुरांना सहाय्य, शेतकरी कर्जमाफीची योजना, गरजुंना अन्नधान्याचे वाटप अशा विविध घटकांचा उल्लेख आहे. त्यात राज्य सरकार स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. हे करताना राज्य सरकार यातील किती सहाय्य केंद्र शासनाने केले याचा उल्लेख करण्याचे सौजन्य दाखविलेले नाही. अधिवेशनाच्या प्रारंभी सत्ताधारी आमदार सायकलवरून आले. हे बेगडी आहे. कोविडची मदत करताना बुहतांश उपाय योजना केंद्र शासनाच्या आहेत. मग राज्य सरकार काय करते आहे. व्हेंटीलेटर, पीपीए कीट यांसह विविध सुविधांसाठी निधी दिला. राज्य सरकार म्हणते कोरोनामुळे एकवीस टक्के महसूल घटला. जीएसटीचे अनुदान परतावा प्राप्त झाला नाही, अशी टिका केली. मात्र आज राज्यात कोरोनाची लस देण्याचा उपक्रम सुरु आहे. हे लसीकरण कोण करते आहे?. मुंबईत 25 लाख लोकांना लस मिळेल, ती कोण देणार?. सात कोटी लोकांना 1 ते 3 रुपये दराने धान्य दिले. त्यासाठी आपली पाठ तोपटून घेतली. परंतु केंद्र सरकारने ही मदत दिली आहे. साडे सतरा लाख टन धान, साडे बारा लाख टन मका खरेदी केंद्रावर खरेदी झाली ती केंद्र सरकारच्या मदतीनेच झाली. प्रत्येक योजना केंद्र सरकारचीच आहे. 222 लाख क्वींटल कापुस खरेदी झाली ती देखील केंद्राच्या मदतीनेच. मात्र प्रत्येक बाबतीत केंद्र सरकारवर टिका केली जाते. 

राज्य सरकारने कोरोना रुग्णालये ऊभारली. व्हेंटीलेटर दिले. जम्बो हॉस्पीटलसह मोठी कामे झाली. मात्र ही कामे उभी रहात असतांमा त्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. देशात कोरोना कमी होत आहे. अशा वेळी महाराष्ट्रातच कोरोना कसा वाढतो. केवळ भ्रष्टाचार व संशयास्पद कामांमुळे कोरोना वाढतो आहे. मग ही चांगली उपाययोजना कशी?. या भ्रष्टाचाराची चौकशी कोण करेल? असा प्रश्‍न त्यांनी केला. 

आमदार गोरे म्हणाले, सातारा जिल्ह्यासाठी जम्बो कोविड हॉस्पीटल उभे राहिले. त्याचा खर्च किती आला. आयसीयू साठी किती खर्च आला. रेमडेसीव्हर इंजेक्‍शनचा दर काय होता?. तेराशे रुपयाचे इंजेक्‍शन तीन ते चार हजार रुपयांना मिळत होते. ऑक्‍सीनेशनचा खर्च किती झाला. कोरोना सुरु होण्यापूर्वी मार्च महिन्यात ऑक्‍सीजन सिलेंडरचे दर 310 रुपये होते ते ऑक्‍टोबर महिन्यात 680 रुपये झाले. दुप्पट किमती झाल्या होत्या. जीवनाश्‍यक औषधे व वस्तुंचे दर वाढता कामा नये असे धोरण आहे, मात्र प्रत्यक्ष काय घडले. जिल्हा नियोजन मंडळाने हा निधी झाला. त्याचा हिशेब आला पाहिजे. गेले तीन चार महिने मी जम्बो हॉस्पीटलचा खर्च किती याची माहिती मागतो आहे. कोणीही ती माहिती देत नाही. जिल्हाधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार व मनमानी थांबवा. शिवभोजनाच्या 12.50 कोटी थाळी दिल्या. त्यावर रोज 1.35 लाख रुपये खर्च होतो आहे. मात्र त्याचा लाभ यापेक्षा अधिक लोकांना घेता आला असता. याच कालावधीत लाखो शेतकऱ्यांचे वीजेचे कनेक्‍शन तोडले आहे. त्यांना वीज जोडणी करुन द्या. ग्रामीण भागात नियमित वीज द्या. 
.... 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com