लाॅकडाऊन धुडकाऊन घेतली परिक्षा; महाविद्यालयावर छापा (व्हिडिओ)

लाॅकडाऊनचे नियम धुडकावत अकरावीच्या विद्यार्थ्यांची फेरपरिक्षा घेणे पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील एका महाविद्यालयाला चांगलेच महागात पडले आहे. ही परिक्षा सुरु असतानाच प्रशासनाने अचानक छापा टाकून संस्थेवर कारवाई केली आ
Action on College of Pune District for Taking Exams in Lock Down
Action on College of Pune District for Taking Exams in Lock Down

तळेगाव दाभाडे : लाॅकडाऊनचे नियम धुडकावत अकरावीच्या विद्यार्थ्यांची फेरपरिक्षा घेणे पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील एका महाविद्यालयाला चांगलेच महागात पडले आहे. ही परिक्षा सुरु असतानाच प्रशासनाने अचानक छापा टाकून संस्थेवर कारवाई केली आहे. 

येथील पंचवटी काॅलनीत असलेल्या स्नेहवर्धक मंडळ शैक्षणिक ट्रस्टच्या ज्युनिअर काॅलेज ऑफ सायन्स अॅन्ड काॅमर्समध्ये अकरावीची फेरपरिक्षा सुरु होती. लाॅकडाऊन आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कायदयाचे उल्लंघन व्यवस्थापनाने केले. मावळ मुळशीचे उपविभागीय अधिकारी तथा आपत्ती निवारण अधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा प्रशासनाने दाखल केला. 

संस्थेचे संचालक मंडळ, प्राचार्य व संबंधित शिक्षक अशा चौदा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, तळेगाव नगरपरिषद मुख्याधिकारी दीपक झिंजाड, पुणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अमरनाथ वाघमोडे, तळेगाव नगरपरिषद शिक्षण मंडळाचे एस. एम. गावडे यांनी ही कारवाई केली. यावेळी परिक्षा देत असलेले २७ विद्यार्थी महाविद्यालात आढळले. 

लाॅकडाऊनबाबत केंद्र शासन, राज्य शासन यांनी मार्गदर्शक नियम घालून दिले आहेत. मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांनीही राज्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना आवाहन केले आहे. पण तरीही या संस्थेने सर्व नियम धुडकावून विद्यार्थ्यांची परिक्षा घेतली. राज्यात लाॅकडाऊनच्या काळात शैक्षणिक संस्थेवरची ही पहिलीच मोठी कारवाई आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com