सावधान : पुणे जिल्ह्याला पुन्हा ऑरेंज अॅलर्ट  - Punekars Beware Orange alert in Pune today | Politics Marathi News - Sarkarnama

सावधान : पुणे जिल्ह्याला पुन्हा ऑरेंज अॅलर्ट 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

काल रात्री बारा वाजल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. रात्री साडेअकरा ते अडीच यावेळेत १५.४ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने गुरूवारी परत पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. 

पुणे : पुणे जिल्ह्याला गुरूवारी पुन्हा हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. त्यामुळे जिल्ह्यात दिवसभरात ६४.५ ते ११५.५ मिलीमीटर पाऊस कोसळेल असेही स्पष्ट केले.  शिवाजीनगर येथील वेधशाळेत बुधवारी सकाळी साडेआठ ते गुरूवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये ११२.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यापैकी ७६ मिलीमीटर पाऊस बुधवारी रात्री साडेआठ ते साडेअकरा या वेळेत झाला. त्यामुळे पुणे पावसाच्या पाण्यात अक्षरश: वेढले गेले. 

शहरात बुधवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागातील सोसायटया, घरे व पार्किंगच्या ठिकाणी पाणी शिरण्याच्या तब्बल ४० पेक्षा जास्त घटना घडल्या. बहुतांश ठिकाणी अग्निशामक दलाच्या जवानानी तत्काळ पोचुन पाणी काढण्याचे काम गुरुवारी पहाटेपर्यंत सुरु ठेवले होते. याबरोबरच ५ ते १० ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या

काल रात्री बारा वाजल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. रात्री साडेअकरा ते अडीच यावेळेत १५.४ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने गुरूवारी परत पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. 

पुण्यात दिवसभर ढगाळ वातावरण रहाणार आहे. त्यामुळे शहर आणि परिसरात दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने दिला. विजांचा गडगडाटासह हा पाऊस पडणार असल्याने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे, असे आवाहनही केले आहे.

शहरात बुधवारी सायंकाळी शहरात पावसाळा सुरुवात झाली. त्यानंतर रात्री पावसाचे प्रमाण वाढले. मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु झाल्याने रस्ते पाण्याने भरुन वाहु लागले. पावसाचे पाणी वाहुन जाण्यासाठी आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था नसल्याने पाणी सोसायटयाचे तळघर, घरे व पार्किंगमध्ये शिरले. त्यामध्ये नागरीकांच्या गाड्या पाण्यात गेल्या.

शहरात बुधवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागातील सोसायटया, घरे व पार्किंगच्या ठिकाणी पाणी शिरण्याच्या तब्बल ४० पेक्षा जास्त घटना घडल्या. बहुतांश ठिकाणी अग्निशामक दलाच्या जवानानी तत्काळ पोचुन पाणी काढण्याचे काम गुरुवारी पहाटेपर्यंत सुरु ठेवले होते. याबरोबरच ५ ते १० ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या.

चंदननगर पोलिस ठाण्यात पाणी

चंदन नगर पोलिस ठाण्यालाही पावसाचया पाण्याचा फटका बसला. संपूर्ण पोलिस ठाण्यात पाणी शिरल्याने पोलिसांचाही गोंधळ उड़ाला.पोलिसांची वाहनेही पावसाच्या पाण्यात बुडाली.

रात्री पाऊस वाढल्याने येरवडा, विश्रांतवाडी, लोहगाव या भागातील  सोसायटया, घरे व पार्किंगच्या ठिकाणी पाणी शिरण्याच्या जास्त घटना घडल्या. शास्त्रीनगर, पोरवाल रोड, चंदननगर, विश्रांतवाडी येथे पाणी शिरले. त्यामुळे नागरीक मोठ्या प्रमाणात चिंतेत होते. दरम्यान, येरवडा, नायडु, हडपसर अग्निशामक दलाच्या गाड्यानी घटनास्थली जाऊन पाणी काढण्याचा प्रयत्न केला.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख