Breaking पुण्यात तुर्तास लाॅकडाऊन नाही; २ तारखेला कठोर निर्णय घेणार - No Lock Down in Pune till Thirty First March Announces Ajit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

Breaking पुण्यात तुर्तास लाॅकडाऊन नाही; २ तारखेला कठोर निर्णय घेणार

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 26 मार्च 2021

शहर, जिल्हा व पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाची स्थिती वाढत असली तरीही तुर्तास लाॅकडाऊन होणार नाही, असे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज स्पष्ट केले. मात्र, लोकांनी नियमांचे पालन केले नाही तर १ एप्रीलनंतर कठोर निर्णय घेण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

पुणे : शहर, जिल्हा व पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाची स्थिती वाढत असली तरीही तुर्तास लाॅकडाऊन होणार नाही, असे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज स्पष्ट केले. मात्र, लोकांनी नियमांचे पालन केले नाही तर १ एप्रीलनंतर कठोर निर्णय घेण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. (No Lock Down in Pune till Thirty First March)

जिल्हाच्या (Pune) कोरोना (Coroan) स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. दत्तात्रेय भरणे, दिलीप वळसे पाटील, सर्व आमदार यावेळी उपस्थित होते. वरिष्ठ पोलिस अधिकारी यावेळी उपस्थित होते. कोरोनाची दुसरी लाट रोखायची तर लाॅकडाऊनशिवाय गत्यंतर नाही, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे, प्रशासकीय अधिकाऱ्याचेही मत आहे. पण एक एप्रीलपर्यंत थांबण्याचा निर्णय आम्ही एकमताने घेतल्याचे पवार यांनी सांगितले. 

आज झालेले निर्णय
- ३० एप्रीलपर्यंत शाळा महाविद्यालये बंद
- बागा फक्त सकाळीच सुरु राहणार
- रात्रीचे निर्बंध कायम
- खासगी रुग्णालयांतले ५० टक्के बेड ताब्यात घेणार
- लाॅन वा मंगल कार्यालयांत फक्त ५० जणांच्या उपस्थितीतच 
- सर्व राजकीय कार्यक्रम बंद
- चित्रपटगृहे ५० टक्के क्षमतेनेच सुरु राहणार
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख