Big Breaking : पुण्यात लाॅकडाऊन नाहीच; पण 'हे' आहेत निर्बंध

कोरोनाच्या वाढत्या उद्रेकाला आळा घालण्यासाठी पुणे शहरात ३१ मार्चपर्यंत नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, लाॅकडाऊन लागणार नाही.विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज ही घोषणा केली.
Corona Fear
Corona Fear

पुणे : कोरोनाच्या वाढत्या उद्रेकाला आळा घालण्यासाठी पुणे शहरात ३१ मार्चपर्यंत नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, लाॅकडाऊन लागणार नाही. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज ही घोषणा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली. त्यात हे निर्बंध जारी करण्यात आले आहेत.

या बैठकीला पुणे व पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांचे महापौर, जिल्हाधिकारी, दोन्ही महापालिका आयुक्त, वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पुण्यात काल १५०४ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ८१२, जिल्ह्यातील ग्रामीण भागात ३८८ रुण सापडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे निर्बंध लावण्यात आले आहे. आज रात्रीपासून त्यांची अंमलबजावणी होणार आहे. लसीकरणासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविणार असल्याचेही राव यांनी सांगितले. खासगी सोसायट्यांमधील क्लब हाऊस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

असे आहेत नवे निर्बंध
रात्री ११ ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी
शाळा- महाविद्यालय ३१ मार्चपर्यंत बंद
दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना सूट 
लग्न समारंभ आणि अंत्यविधी कार्यक्रमासाठी ५० व्यक्तींची उपस्थिती
हॉटेल्स, दुकाने, बिअर बार रात्री दहा वाजेपर्यंत खुले
हाॅटेल्स-बार ५० टक्के क्षमतेने चालवण्याची मुभा
हाॅटेलबाहेर बसलेल्या ग्राहकांची संख्या बोर्डावर लावणे बंधनकारक
११ पर्यंत होम डिलिव्हरीला परवानगी
शहरातील सर्व उद्याने बंद सायंकाळी ठेवणार
गृहनिर्माण सोसायट्यांमधील क्लब हाऊस बंद ठेवणार
अभ्यासिका निम्म्या क्षमतेने चालू ठेवणार
विवाह सोहोळ्यांसाठी पोलिस परवानगी आवश्यक
नियमभंग दिसल्यास हाॅल सील करण्याची व गुन्हा दाखल करण्याची कारवाई

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com