लॉकडाउन ५ निश्चित.....शिथिलतेमध्ये काळजी घेणे आवश्यक

देशात लागू केलेल्या चवथ्या लाॅकडाऊनची मुदत ३१ मे रोजी संपत आहे. ही मुदत वाढवली जाऊन पाचवा लाॅकडाऊन लागू केला जाण्याची शक्यता आहे. यात काही व्यवहारांबाबत शिथिलता राहणार असून त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना गुरूवारी रात्री 'स्मार्ट सिटी' प्रशासनाने जाहीर केल्या आहेत.
Lock Down 5 Inevitable in Pune and Mumbai
Lock Down 5 Inevitable in Pune and Mumbai

पुणे : देशात लागू केलेल्या चवथ्या लाॅकडाऊनची मुदत ३१ मे रोजी संपत आहे. ही मुदत वाढवली जाऊन पाचवा लाॅकडाऊन लागू केला जाण्याची शक्यता आहे. यात काही व्यवहारांबाबत शिथिलता राहणार असून त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना गुरूवारी रात्री 'स्मार्ट सिटी' प्रशासनाने जाहीर केल्या आहेत. 

विशेषतः प्रतिबंधित क्षेत्राबाहेर नागरिकांनी काय करावे व काय करु नये याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विवाह सोहळे, अंत्यविधी यासाठी किती लोक उपस्थित राहू शकतात याचा निर्णय जिल्हाधिकारी पातळीवर घेतला जाईल, असे सांगण्यात आले आहे. कामाच्या ठिकाणी पाच जणांपेक्षा जास्त लोकांनी एकत्रित येण्यावरही बंदी कायम ठेवण्यात आली आहे. 

पुणे आणि मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता किमान मुंबई आणि पुण्यात लाॅकडाऊन ५ लागू केला जाईल हे जवळपास स्पष्ट आहे. प्रतिबंधित क्षेत्रांमधले कडक निर्बंध कायमच राहणार असून या क्षेत्राबाहेरची कार्यालये, व्यवसाय या ठिकाणी देण्यात आलेल्या शिथिलतेमध्ये घेण्याच्या खबरदारीबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना पाठवल्या आहेत. 

हे करावं लागेल...

- सक्तीने मास्क लावा
- सोशळ डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन हवे
- कामाच्या ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोक एकत्र नकोत
- सार्वजनिक ठइकाणी थुंकल्यास दंड
(विवाह, अंत्यविधीसाठी किती लोकांना परवानगी याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी घेणार)
- कामाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनर, सॅनिटायझर आवश्यक
- जेवणाच्या वेळा वेगवेगळ्या हव्यात
- घरात ज्येष्ठ नागरिक किंवा पाच वर्षांखालील मुलं असल्यास संबंधितांना 'वर्क फ्राॅम होम' द्यावे
- आरोग्य सेतू अॅपचा वापर आवश्यक
- मोठ्या बैठका नको
- प्रतिकारशक्ती वाढविण्याबाबत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन हवे
- कार्यालयाचे प्रवेशद्वार, कँटिन, लिफ्ट, लाॅबी, स्वच्छतागृहांत सातत्याने निर्जंतुकीकरण
- कामगारांच्या येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र बस हवी
- बसमध्ये क्षमतेच्या ४० टक्के प्रवाशांनाच परवानगी
- आवश्यकता नसेल तर व्हिजिटर्स टाळा
- लिफ्टमध्ये चार पेक्षा जास्त व्यक्ती नकोत
- शक्यतो जिन्यांचा वापर करावा
- तंबाखू, गुटखा बंद
- नजिकचे दवाखाने, हाॅस्पीटल्सची माहिती दर्शनी भागात लावणे


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com