अजित पवारांना फोन केला तरी बेड मिळणार नाही.... - I also Against Lock Down Say Ajit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

अजित पवारांना फोन केला तरी बेड मिळणार नाही....

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

एखाद्या घरात कोरोना (Corona) रूग्ण असेल तरी. त्या घरातील इतर लोक गाव भर फिरातात.  काही उपयोग होत नाही.  संख्या आवाक्याबाहेर गेली तर अजित पवार यांना फोन केला तरी बेड मिळायचे नाही... त्या वेळी काय करणार? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पुण्यात (Pune) झालेल्या बैठकीत उपस्थित केला.

पुणे : मी पण लॉकडाऊन च्या विरोधात आहे.पण संख्या ज्या पध्दतीने वाढते आहे ते पाहता त्या शंभर टक्के हाॅस्पिटल ताब्यात घेतली तरी बेड मिळणे कठीण आहे. लोक ऐकतच नाहीत. कडक निर्बंध घातले तरी. पोलिस, आयुक्त निर्बंध पडतात. एखाद्या घरात कोरोना (Corona) रूग्ण असेल तरी. त्या घरातील इतर लोक गाव भर फिरातात.  काही उपयोग होत नाही.  संख्या आवाक्याबाहेर गेली तर अजित पवार यांना फोन केला तरी बेड मिळायचे नाही... त्या वेळी काय करणार?" असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पुण्यात (Pune) झालेल्या बैठकीत उपस्थित केला. I also Against Lock Down Say Ajit Pawar

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. सर्व लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व पोलिस (Police) अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत जवळपास सर्वच बैठकीत लोकप्रतिनिधींनी लाॅकडाऊन (Lock Down) नको पण कडक निर्बंध लागू करा अशी भूमिका घेतली.

लसीकरण (Vaccination Centres) केंद्र वाढविण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. आणखी ५० ऑक्सिजन (Oxygen) आणि २२५ व्हेंटिलेटर बेड्सची गरज आहे. सध्या ८०० रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याने तो चिंतेचा विषय आहे. १३ ऑक्टोबर २०२० ला खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड्स प्रशासनाच्या ताब्यात होते. ६ एप्रिलपर्यंत तेवढेच बेड्स ताब्यात घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.कोल्हापूर वगळता इतर चार जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. पुणे विभागात ऑक्सिजनचा काही प्रमाणात तुटवडा भासत आहे.पुणे महापालिकेकडून सार्वजनिक ठिकाणी थुंकणे यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. I also Against Lock Down Say Ajit Pawar

काय म्हणाले लोकप्रतिनिधी
महापौर मुरलीधर मोहोळ
- पुढील आठवड्यात अडीच हजार बेड्स कमी पडतील.
- लसीकरण वाढवण्याची गरज.
- कडक निर्बंध लावावेत, 
- आरोग्य यंत्रणा सक्षम करावी.

खासदार वंदना चव्हाण -  कडक निर्बंध लावण्याची गरज
- काही रुग्णालये १०० टक्के नॉनकोविड ठेवावीत
- दिव्यांग व्यक्तींना लस उपलब्ध करावी
- लसीकरणाबाबत फेसबुकवर, ट्विटरवर माहिती द्यावी
- लोकप्रतिनिधींना उपाययोजनांबाबत प्रशासनाकडून व्यवस्थित माहिती मिळत नाही.
- लॉकडाऊन नको, कडक निर्बंध लादावेत
- निर्बंध सायंकाळी सहापर्यंत नको

खासदार डॉ. अमोल कोल्हे -  १८ वर्षे वयावरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून द्यावी
- लॉकडाऊन पर्याय नाही,
मृत्यु दर नियंत्रणात आणावा.
- गर्दीच्या ठिकाणी, हॉटेल्समध्ये फेस शील्ड अनिवार्य करावेत

खासदार श्रीरंग बारणे - 
 लॉकडाऊन नको, निर्बंध कडक करावेत.

खासदार गिरीश बापट - सर्व राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी सभा, मिरवणुका टाळाव्यात.
- लसीकरण वाढवा.
- पोलिसांकडून दंडात्मक कारवाई परंतु पावतीवर कोरोनाचा उल्लेख नाही. त्यामुळे नागरिकांना अडचण येण्याची शक्यता
- रस्त्यावर अनावश्यक फिरणाऱ्यावर निर्बंध लावा 

महापालिका आयुक्त विक्रम कुमार - दररोज रुग्णसंख्या ९००० वर जाईल
शंभरपैकी ३८ ते ४० लोक पॉझिटिव्ह
मायक्रो कंटेन्मेंट झोनचा प्रश्नच राहिला नाही.

सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे -  
पथारी व्यावसायिकांची आणि आस्थापना चालकांची कोरोना चाचणी करावी
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख