आंबेगाव तालुक्‍यात कोरोनाची एन्ट्री 

आंबेगाव तालुक्‍यात साकोरे येथे मुंबईहून पती-पत्नी शुक्रवारी (ता. 15) आले होते. त्यातीलपतीचा कोरोनाचाअहवाल पॉझिटिव्ह आला असून पत्नीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
आंबेगाव तालुक्‍यात कोरोनाची एन्ट्री 
Corona patients found in Ambegaon taluka

महाळुंगे पडवळ : आंबेगाव तालुक्‍यात साकोरे येथे मुंबईहून पती-पत्नी शुक्रवारी (ता. 15) आले होते. याची चाहूल प्रशासन व ग्रामपंचायतीला लागल्यानंतर त्यांनी शनिवारी (ता. 16) वैद्यकीय तपासणीसाठी पिंपरी चिंचवड येथे पाठविले. त्यातील पतीचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून पत्नीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.   

प्रशासनाने सतर्कता दाखविल्यामुळे गावातील अन्य व्यक्तींबरोबर होणारा त्यांचा संपर्क टळला आहे. खरबदारीचा उपाय म्हणून साकोरे परिसर सील करण्यात आला आहे. 

गेली दीड महिना प्रशासन कोरोनाचा शिरकाव आंबेगाव तालुक्‍यात होऊ नये; म्हणून प्रयत्नांची पराकष्ठा करत होते. पण, मुंबईहून आलेल्या व्यक्तींमुळे तालुक्‍यात कोरोनाचा शिरकाव झाला असून पहिला रुग्ण साकोरे येथे सापडला आहे. यामध्ये प्रशासनाचा काही एक दोष नाही, असा दावा ग्रामपंचायतीने केला आहे. 

मुंबईहून आलेल्या या कुटुंबीयांनी स्वतःला साकोरे गावाबाहेर असलेल्या घरात होम क्वॉरंटाइन केले होते. या दांपत्याला शनिवारी (ता. 16) पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे तपासणी केल्यानंतर पतीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून पत्नीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अन्य नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्‍यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये; म्हणून गावात उपाय योजना सुरू करण्यात आल्या आहेत. रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणाच्या परिसरातील एक किलोमीटर अंतरात पूर्ण सील केले जाणार आहे. संपूर्ण गावात सर्वेक्षण करून लक्षणे आढळून आल्यास नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in