चाकणच्या मुख्याधिकाऱ्यांचा पदभार काढला 

चाकणच्या (ता. खेड) मुख्याधिकारी डॉ. नीलम पाटील यांचा नगर परिषदेचा पदभार काढून घेण्यात आला आहे. त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा देण्यास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले आहे.
चाकणच्या मुख्याधिकाऱ्यांचा पदभार काढला 
The Chief Officer of Chakan Removed charge of the Municipality

चाकण ः चाकणच्या (ता. खेड) मुख्याधिकारी डॉ. नीलम पाटील यांचा नगर परिषदेचा पदभार काढून घेण्यात आला आहे. त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा देण्यास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले आहे. याबाबतची माहिती मुख्याधिकारी पाटील यांनी स्वतः दिली. 

चाकण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष शेखर घोगरे यांनी मुख्यधिकारी नीलम पाटील यांच्या विरोधात पोलिसांत ऍट्रोसिटीची तक्रार दिली होती. त्यानंतर त्यांच्यावर ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. मुख्यधिकारी पाटील यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे. 

नगराध्यक्ष घोगरे व मुख्यधिकारी पाटील यांच्यातील वाद विकोपाला गेले आहेत. खेडचे प्रांताधिकारी संजय तेली यांच्याकडे नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी मुख्यधिकारी पाटील यांच्या विरोधात विविध तक्रारी अर्ज केले होते. त्या अर्जाची चौकशी करून प्रांताधिकारी तेली यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल दिला होता. त्यानंतर मुख्याधिकारी पाटील यांचा पदभार काढून घेण्यात आला आहे. 

दरम्यान, नगराध्यक्ष घोगरे यांनी मात्र मुख्यधिकारी पाटील यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सक्तीच्या रजेवर पाठविले असल्याचे म्हटले आहे. 
 


कोरोना राहिला बाजूला... नगरसेवक-मुख्याधिकाऱ्यांमध्येच जुंपली 

चाकण ः चाकण (ता. खेड) नगर परिषदेतील सर्व नगरसेवकांनी गेल्या सोमवारी जनता कर्फ्यूचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. या कर्फ्यूला मुख्यधिकाऱ्यांनी मात्र विरोध दर्शविला. त्यावरून सर्वपक्षीय नगरसेवक-मुख्याधिकारी आमने-सामने आले होते. प्रशासन विरुद्ध पदाधिकारी असाचा सामना रंगल्याने नागरिक मात्र संभ्रमात पडले होते. 

दुकाने सुरू झाल्यावर शहरात गर्दी वाढली होती. गर्दी रोखण्यासाठी सर्व नगरसेवकांनी जनता कर्फ्यू जाहीर केला होता. नगराध्यक्ष, नगरसेवकांनी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन दुकानदारांना केले होते. पण मुख्याधिकारी नीलम पाटील यांनी चोवीस तास अगोदर नोटीस न दिल्याने जनता कर्फ्यू जाहीर करणे, चुकीचे आहे. दुकाने नेहमीप्रमाणे सुरू ठेवावीत, असे शहरात रिक्षा फिरवून आवाहन केले होते. त्यास नगराध्यक्ष शेखर घोगरे व सर्व नगरसेवकांनी विरोध करून मुख्याधिकाऱ्यांचा निषेध केला. 

नगराध्यक्ष घोगरे, उपनगराध्यक्ष हृषिकेश झगडे, नगरसेवक जीवन सोनवणे, नीलेश गोरे, प्रकाश गोरे, धीरज मुटके, मंगल गोरे, मेनका बनकर, प्रवीण गोरे, विशाल नायकवाडी, प्रकाश भुजबळ व इतर आज सकाळी रस्त्यावर उतरले आणि जनता कर्फ्यू शांततेत पार पडण्यासाठी प्रयत्न केले. शहरातील सर्व दुकाने बंद राहिली आणि वाहतूकही कमी प्रमाणात राहिली होती. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in