बारामतीत ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला.... - Baramati Grampanchayat Elections Process Started | Politics Marathi News - Sarkarnama

बारामतीत ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला....

मिलिंद संगई
बुधवार, 23 डिसेंबर 2020

या निवडणूकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून यंदाच्या निवडणूकीत मतदानाच्या वेळेस इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर केला जाणार आहे. सदस्यांतून सरपंचांची निवड होणार असल्याने यंदा मतदान यंत्रांवर फक्त सदस्यांचीच नावे असतील. जो सदस्य असेल त्यापैकीच एकाला सरपंच पदाची संधी मिळणार आहे. 

बारामती : तालुक्यातील 52 ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचा बिगुल आजपासून वाजला. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या पहिल्या दिवशी पाच उमेदवारांनी ऑनलाईन आपले अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तहसिलदार विजय पाटील यांनी दिली.

या निवडणूकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून यंदाच्या निवडणूकीत मतदानाच्या वेळेस इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर केला जाणार आहे. सदस्यांतून सरपंचांची निवड होणार असल्याने यंदा मतदान यंत्रांवर फक्त सदस्यांचीच नावे असतील. जो सदस्य असेल त्यापैकीच एकाला सरपंच पदाची संधी मिळणार आहे. 

माळेगाव बुद्रुक येथे नगरपंचायत स्थापन करण्याबाबत राज्य सरकारने निवडणूक आयोगाला दिले असले तरी निवडणूक आयोगाकडून या बाबत सूचना आलेल्या नसल्याने येथील निवडणूक प्रक्रीयाही सुरु झाली आहे. 

बारामतीतील ग्रामपंचायत निवडणूक दृष्टीक्षेप
•    एकूण सदस्य संख्या- 522
•    प्रभाग संख्या- 187
•    मतदारसंख्या- 142153 स्त्री- 68284 पुरुष-73869
•    मतदान केंद्र संख्या- 230
•    एका प्रभागात दोन किंवा तीन उमेदवार
•    52 ग्रामपंचायतींसाठी 29 निवडणूक निर्णय अधिकारी
•    सेतू, महा ईसेवा केंद्रात अर्ज दाखल करता येणार
•    30 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत
•    31 डिसेंबरला छाननी तर 4 जानेवारी पर्यंत अर्ज मागे घेता येणार
•    15 जानेवारीला मतदान तर 18 जानेवारीला बारामतीत मतमोजणी 
•    7 ते 9 सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीसाठी खर्चाची मर्यादा 25 हजार, 11 ते 13 सदस्यसंख्या असल्यास 35 हजार व 15 ते 17 संख्या असल्यास प्रत्येकी 50 हजार रुपये. 
•    प्रचारसभांना बंदी नाही मात्र कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे बंधन
•    13 सप्टेंबर 2001 नंतर ज्यांना दोनहून अधिक अपत्ये असतील ते अपात्र.
•    सदस्यत्वासाठी ज्यांचा जन्म 1 जानेवारी 1995 नंतर झाला आहे त्यांना किमान सातवी उत्तीर्ण असण्याचे बंधन

निवडणूक होणाऱया ग्रामपंचायती-  

अंजनगाव, आंबी खुर्द, ब-हाणपूर, बाबुर्डी, चोपडज, ढाकाळे, ढेकळवाडी, देऊळगाव रसाळ, गोजूबावी, घाडगेवाडी, होळ, सदोबाचीवाडी, सस्तेवाडी, जळगाव सुपे, जोगवडी, जैनकवाडी, कटफळ, कारखेल, कांबळेश्वर, कोऱहाळे बुद्रूक, थोपटेवाडी, खंडोबाचीवाडी, खांडज, लाटे, माळेगाव खुर्द, माळवाडी (लाटे), माळवाडी (लोणी), मेखळी, मोढवे, नारोळी, निंबुत, निरावागज, पिंपळी, सावळ, सांगवी, शिरवली, शिरष्णे, सोनवडी सुपे, सोनगाव, तरडोली, उंडवडी सुपे, वढाणे, वडगाव निंबाळकर, वाकी, झारगडवाडी, माळेगाव बुद्रूक, पाहुणेवाडी, मळद, कन्हेरी, मुर्टी, मोराळवाडी, खराडेवाडी.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख