पिंपरी चिंचवडच्या बजेटमध्ये सर्वाधिक तरतूद महेशदादांच्या भोसरीसाठी

दोन कोटी ४३ लाख रुपये शिलकीचा पाच हजार ५८८ कोटी ७८ लाख रुपयांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मूळ अर्थसंकल्प पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी स्थायी समितीला सादर केला. केंद्रीय योजनांचा निधी धरून एकूण अर्थसंकल्प हा सात हजार ११२ कोटी एक लाख रुपयांचा असून तेवढाच खर्चही दाखविण्यात आला आहे.दोन कोटी ४३ लाख रुपये शिलकीचा पाच हजार ५८८ कोटी ७८ लाख रुपयांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मूळ अर्थसंकल्प पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी स्थायी समितीला सादर केला. केंद्रीय योजनांचा निधी धरून एकूण अर्थसंकल्प हा सात हजार ११२ कोटी एक लाख रुपयांचा असून तेवढाच खर्चही दाखविण्यात आला आहे.
PCMC Buget submitte to Standing Committee
PCMC Buget submitte to Standing Committee

पिंपरी : दोन कोटी ४३ लाख रुपये शिलकीचा पाच हजार ५८८ कोटी ७८ लाख रुपयांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मूळ अर्थसंकल्प पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी स्थायी समितीला सादर केला. केंद्रीय योजनांचा निधी धरून एकूण अर्थसंकल्प हा सात हजार ११२ कोटी एक लाख रुपयांचा असून तेवढाच खर्चही दाखविण्यात आला आहे.कुठलीही नवी नाविण्यपूर्ण योजनेची घोषणा त्यात नाही.कोरोना आणि वर्षभरावर आलेल्या पालिका निवडणुकीमुळे करवाढ न करण्यात आल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.  

दरम्यान,तीन दिवसांपूर्वी आलेले आयुक्त राजेश पाटील यांचा हा पहिलाच,तर पालिकेचा ३९ वा अर्थसंकल्प आहे. त्यावर स्पष्टपणे नुकतेच बदली झालेले आयुक्त हर्डीकर यांची छाप व भोसरीचे भाजपचे आमदार महेशदादा लांडगे यांचा वरचष्मा दिसून आला आहे.कारण त्यात सर्वाधिक तरतूद ही भोसरीतील विकासकामांवर केली गेली आहे. मात्र, शहरात सुरु असलेल्या  मेटोसाठी एक पै ची ही तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे कालच राज्य मंत्रीमंडळाने मंजूरी दिलेला व खर्चात ८० टक्के पालिकेचा हिस्सा असलेल्या पिंपरी ते निगडी या मेट्रोच्या विस्तारित मार्गाला तूर्त ब्रेक बसण्याची भीती आहे. जुनेच प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणखी निधी या बजेटमध्ये देण्यात आला आहे. त्याला दुजोरा देताना जुन्या योजना पूर्ण कशा करता येतील, हे प्रथम पाहू, असे आयुक्तांच्या वक्तव्याने मिळाला आहे. मोशी येथे बहूउद्देशीय स्टेडियम (एक कोटी),चिखलीत हॉस्पिटल (एक कोटी) आदीसारखे घोषणा झालेले नवीन प्रकल्प भोसरीतील आहेत.

अर्थसंकल्पातील सर्वाधिक १२३२ कोटी ३४ लाख रुपयांचा निधी हा नाविण्यपूर्ण योजनांसाठी खर्च केला जाणार आहे.तर, सर्वाधिक महसूल हा जीएसटीतून १८९८ कोटी १२ लाख मिळणार आहे.त्याखालोखाल एलबीटीतून ३०१ कोटी पन्नास लाख आणि गुंतवणुकीवरील व्याजापोटी १९३ कोटी पन्नास लाख येणार आहेत.सर्वांच्या सहकार्यातून पिंपरी-चिंचवड शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे करणे शक्य आहे,अशी आय़ुक्तांची या बजेटवरची प्रतिक्रिया आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com