इंग्लडहून आलेल्या दोघांना कोरोना, ५३ जणांचे अहवाल येणे बाकी - PCMC Administration is in Problem due to England Returned Passengers | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

इंग्लडहून आलेल्या दोघांना कोरोना, ५३ जणांचे अहवाल येणे बाकी

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 30 डिसेंबर 2020

इंग्लंडहून आलेल्या ५३ जणांचे या आजाराच्या चाचणीचे अहवाल येणे बाकी असल्याने पालिका प्रशासन अद्याप गॅसवर आहे. दुसरीकडे प्रशासन प्रमुखआयुक्त मोठ्या रजेवर गेले असून तीनपैकी दोन अतिरिक्त आयुक्तपदेही रिक्त असल्याने सगळा डोलारा एकमेव अतिरिक्त आयुक्तांवर आला आहे.

पिंपरी : इंग्लडहून पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या आणखी एका प्रवाशाचा कोरोना तपासणीचा अहवाल काल पॉझीटीव्ह आला. त्यामुळे नव्या कोरोनाचा अधिक घातक विषाणू आलेल्या इंग्लडहून शहरात आलेल्या व या साथीचा प्रार्दूभाव झालेल्यांची संख्या आता दोन झाली आहे.

इंग्लंडहून आलेल्या ५३ जणांचे या आजाराच्या चाचणीचे अहवाल येणे बाकी असल्याने पालिका प्रशासन अद्याप गॅसवर आहे. दुसरीकडे प्रशासन प्रमुखआयुक्त मोठ्या रजेवर गेले असून तीनपैकी दोन अतिरिक्त आयुक्तपदेही रिक्त असल्याने सगळा डोलारा एकमेव अतिरिक्त आयुक्तांवर आला आहे.

गेल्या महिन्याभरात शहरात इंग्लडहून आलेल्या २१५ पैकी १६७ जणांची पालिकेने कोरोना चाचणी केली.त्यातील ११२ जण निगेटीव्ह आहेत. मात्र, ५३ जणांचे अहवाल येणे बाकी असल्याने प्रशासन गॅसवरच आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन इंग्लडमध्ये आढळल्याने तेथून शहरात गेल्या महिन्याभरात आलेल्या अशा प्रवाशांनी संपर्क साधण्याचे आवाहन पालिकेने केले होते. त्यानुसार आतापर्यंत २१५ जणांनी तो केला आहे. प्रत्यक्षात त्यापेक्षाही हा आकडा अधिक असल्याची संशय आहे. 

या सर्वांना शहरातील दोन हॉटेलात क्वांरटांईन करण्यात आले आहे.इंग्लडहून आलेल्या एकासह शहरातील इतर १२० अशा एकूण १२१ जणांची नव्याने कोरोना रुग्ण म्हणून काल भर पडली.त्यामुळे शहरातील या रुग्णांचा आकडा आता लाखाच्या जवळ  (९६३१६)गेला आहे.तर,गेल्या २४ तासांत आणखी तिघांचा मृत्यू झाल्याने या साथीचा शहरातील बळींचा आकडा २४४७ झाला आहे.अद्याप १५४७ हे रुग्ण उपचार घेत आहेत.

दरम्यान, नवा कोरोना आलेल्या इंग्लडहून शहरात आलेल्या काही शेकडा प्रवाशांनी प्रशासनाची चिंता वाढवली असताना सोमवारपासून आयुक्त श्रावण हर्डीकर हे,मात्र रजेवर गेले आहेत. तीनपैकी एका अतिरिक्त आय़ुक्तांची बदली झाली असून दुसऱ्यांनी सेवानिवृत्ती घेतली आहे. त्यात पालिकेचा वैद्यकीय विभाग व त्याचे प्रमुख तेवढे सक्षम नाहीत.त्यांच्या कार्यक्षमतेवर यापूर्वीच स्थायी व पालिका सभेतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे. 

अशा स्थितीत आयएएस व अनुभवी असलेल्या आयुक्तांनी थांबणे गरजेचे होते,असा सूर पालिका वर्तुळातच नाही,तर शहरातही आहे. मात्र,बढतीवर बदली होण्याची शक्यता असल्याने आयुक्त दीर्घ रजेवर गेल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. दुसरीकडे ही बदली होण्यापूर्वीच आयुक्त म्हणून आपल्या मर्जीतील अधिकारी आणण्याच्या हालचाली शहरात सुरु झाल्या आहेत.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख