नितीन राऊतांच्या विरोधात मनसेची पिंपरीच्या सर्व पोलिस ठाण्यांमध्ये तक्रार
MNS Aggressive Aginst Power Minister Nitin Raut

नितीन राऊतांच्या विरोधात मनसेची पिंपरीच्या सर्व पोलिस ठाण्यांमध्ये तक्रार

लॉकडाऊनमधील वीजमाफीचे आश्वासन न पाळून जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरुद्ध मनसेने पिंपरी-चिंचवडमध्येही मोर्चा खोलला आहे.त्यांच्यासह ऊर्जासचिव आणि महावितरण वीज कंपनीच्या कार्यकारी संचालकांविरुद्धही कटकारस्थान करून जनतेची फसवणूक व लूबाडणूक केल्याबद्दल मनसेने पोलिसांत तक्रार दिली आहे

पिंपरी : लॉकडाऊनमधील वीजमाफीचे आश्वासन न पाळून जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरुद्ध मनसेने पिंपरी-चिंचवडमध्येही मोर्चा खोलला आहे.

त्यांच्यासह ऊर्जासचिव आणि महावितरण वीज कंपनीच्या कार्यकारी संचालकांविरुद्धही कटकारस्थान करून जनतेची फसवणूक व लूबाडणूक केल्याबद्दल मनसेने पोलिसांत तक्रार दिली आहे. वीजबिल माफी झालीच पाहिजे आणि नितीन राऊत हाय हाय,अशा घोषणा यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यासमोरच दिल्या.

दरम्यान,यानिमित्ताने ऊर्जामंत्र्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्याचे मुंबईतील लोण आता राज्यभर पसरू लागले आहे. पिंपरी चिंचवडमधील दिघी पोलिस ठाण्यात काल ही तक्रार नुसती देण्यातच आली नाही,तर मनसेने ठाण्याबाहेर आंदोलनही केले.

शहराध्यक्ष सचिन चिखले, उपशहराध्यक्ष राजू सावळे विशाल मानकरी,सचिव राहूल जाधव,भोसरी विधानसभा अध्यक्ष अंकुश तापकीर,विभागाध्यक्ष दत्ता देवतरासे,, संतोष यादव, दिग्विजय गवस हेमंत, तिवारी प्रतिक शिंदे, सुधीर भालेराव, आकाश मोहिते, अभिजीत शिंगले, मयूर हजारे, रवी जाधव, आबा कापसे, गणेश लोणारी, तुषार बनसोडे, दत्ता धर्म, तानाजी चोरमले विशाल ओव्हाळ आदींनी त्यात घेतला.

शहरातील सर्वच पोलिस ठाण्यांत राऊतांविरुद्ध अशी तक्रार आज देणार असल्याचे चिखले यांनी सांगितले.वीजबील माफीवरून घूमजाव करून उलट त्या काळात आलेली भरमसाठ बिले भरली नाहीत,तर वीज कनेक्शन तोडू,अशी धमकी देण्यात आल्याने मनसे आणखी आक्रमक झाली आहे. कारण त्यांचा व राज ठाकरेंचा वीजबिल माफीसाठी अधिक पाठपुरावा राहिलेला आहे. मनसेच्या शिष्टमंडळाने ऊर्जामंत्री,ऊर्जासचिव यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे हे,तर यापश्नी राज्यपालांनाच भेटले होते.

Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in