पिंपरी : कोरोनामुळे विकासकामांना ब्रेक; भांडवली खर्च आता कोरानावर

कोरोना महामारीमु0ळे श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकाही जेरीस आली आहे. तिला आपल्या विकासकामांना तूर्त काहीसा ब्रेक लावावा लागला आहे. कारण त्यावर चालू वर्षाच्या (२०२०-२१)बजेटमध्ये करण्यात आलेली ७८ कोटी रुपयांची तरतूद आता कोरोनावर खर्च होणार आहे
पिंपरी : कोरोनामुळे विकासकामांना ब्रेक; भांडवली खर्च आता कोरानावर
Pimpri Chinchwad Municipal Corporation Building

पिंपरी : कोरोना महामारीमु0ळे श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकाही जेरीस आली आहे. तिला आपल्या विकासकामांना तूर्त काहीसा ब्रेक लावावा लागला आहे. कारण त्यावर चालू वर्षाच्या (२०२०-२१)बजेटमध्ये करण्यात आलेली ७८ कोटी रुपयांची तरतूद आता कोरोनावर खर्च होणार आहे. त्यासाठी ही भांडवली तरतूद कोरोना निधी म्हणून वर्ग करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. परिणामी  मंजूर होऊन बजेमध्ये आर्थिक तरतूदही झालेली काही विकासकामे आता होणार नाहीत.

किमान पुढील पाच महिने (मार्च २०२१ अखेर) काही कमी महत्वाची व कमी तातडीची विकासकामे पिंपरी-चिंचवडमध्ये होणार नाहीत.तर, त्यानंतरच्या वर्षात (२०२२) पालिकेची सार्वत्रिक निवडणूक आहे.त्यामुळे या कामासाठी पु्न्हा तरतूद करण्याची अखरेची संधी या टर्मच्या शेवटच्या आगामी बजेटमध्ये राहणार आहे.त्यामुळे आपापल्या प्रभागातील रख़डलेल्या या कामांसाठी सबंधित नगरसेवकांना मोठी धडपड करावी लागणार आहे.

मुळा व पवना नदीवर पूल उभारणे, पदपथ, सायकल ट्रॅक,मैदान विकसित करणे,एचसीएमटीआर तथा उच्चक्षमता द्रुतगती महामार्ग विकसित करणे,रस्तेबांधणी, रस्ते कॉंक्रीटीकरण आदी ४२ कामांना ब्रेक लागणार आहे. त्यासाठी बजेटमध्ये ४०५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यातीलच ७८ कोटी रुपये आता वर्ग करण्यात येणार आहेत.स्थायी समितीने पालिका प्रशासन तथा आयुक्तांचा हा विषय मंजूर केला आहे. आता तो अंतिम मान्यतेसाठी येत्या शुक्रवारच्या (ता.६) पालिका सभेच्या अजेंड्यावर आहे.

कोरोनासाठी मदत (अनुदान) देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे.मात्र, आरोग्य,वैद्यकीय,आपत्ती  व्यवस्थापन आदी पालिकेच्या काही विभागांनी खर्चाची मागणी केल्याने तातडीची निकड म्हणून बजेटमधील भांडवली तरतूद वळती करण्याचे ठरवले असल्याचे पालिकेच्या लेखा विभागातून सांगण्यात आले. कोरोना निधी हे खास लेखाशिर्ष (अकाउंट हेड) कोरोनावरील खर्चासाठी तयार करण्यात आल्याची माहितीही या विभागातून देण्यात आली. या हेडसाठीच भांडवली तरतूद वर्ग केली जाणार आहे.

Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in