थोर व्यक्तींच्या यादीत प्रबोधनकार व बाळासाहेबही
Prabodhankar Thackeray - Balasaheb Thackeray

थोर व्यक्तींच्या यादीत प्रबोधनकार व बाळासाहेबही

राज्य शासनाच्या थोर व्यक्तींच्या यादीत आता प्रबोधनकार तथा केशव सीताराम ठाकरे, त्यांचे पूत्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आणि कृषीक्रांतीचे अग्रदूत डॉ. भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख यांचा समावेश झाला आहे. त्यामुळे त्यांची जयंती आता राज्य शासनाकडून साजरी केली जाणारआहे.

पिंपरी : राज्य शासनाच्या थोर व्यक्तींच्या यादीत आता प्रबोधनकार तथा केशव सीताराम ठाकरे, त्यांचे पूत्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आणि कृषीक्रांतीचे अग्रदूत डॉ. भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख यांचा समावेश झाला आहे. त्यामुळे त्यांची जयंती आता राज्य शासनाकडून साजरी केली जाणार  आहे. 

राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती आणि राष्ट्रीय दिन राज्य सरकारतर्फे साजरे केले जातात. राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या जयंतदिनी शासकीय कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाते.तर राष्ट्रीय दिनी शपथ घेतली जाते. २० डिसेंबर २०२० ला राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या जीआरमध्ये राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती व राष्ट्रीय दिनाचा आकडा हा ३७ होता. त्यात सुधारणा करून काल नवा आदेश काढण्यात आला. त्यामुळे आता ही यादी ४१ वर गेली आहे. 

त्यामुळे या महिन्याच्या २३ तारखेला येणारी शिवसेनाप्रमुखांची जयंती प्रथमच शासकीय स्तरावर साजरी केली जाणार आहे. त्यानंतर दर्पणकार (ता.१६ फेब्रु.),प्रबोधनकार (१७ सप्टें.) आणि डॉ.पंजाबराव देशमुखांच्या (ता.२७ डिसें.) जयंतीलाही त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली सरकारी कार्यालयात अर्पण केली जाणार आहे. राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या जयंतीसह शहीद दिन, दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिन आणि सदभावना दिनही सरकार पाळते. दहशतवादविरोधी व सदभावना दिनी दरवर्षी शपथ घेतली जाते.
Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in