भूखंड गैरव्यवहार प्रकरणी चौकशीची नवी मुंबईच्या माजी महापौरांची मागणी - Navi Mumbai EX Mayor Demands probe in MIDC Land Scam | Politics Marathi News - Sarkarnama

भूखंड गैरव्यवहार प्रकरणी चौकशीची नवी मुंबईच्या माजी महापौरांची मागणी

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

नवी मुंबईत एम.आय.डी.सी. प्रकल्पग्रस्तांच्या नावाखाली त्यांची फक्त नाव आणि कागदपत्र लावून धन धाडग्यांना रबाले येथील पीएपी चा भूखंड क्र ५९१/५९२ लाटण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी केला आहे.

वाशी : नवी मुंबईत एम.आय.डी.सी. प्रकल्पग्रस्तांच्या नावाखाली त्यांची फक्त नाव आणि कागदपत्र लावून धन धाडग्यांना रबाले येथील पीएपी चा भूखंड क्र ५९१/५९२ लाटण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी केला आहे. यांसदर्भात एमआयडीसी प्रशासनाला पत्रव्यवहार करत या गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेकडून रबाले येथील झोपडपट्टीपरिसरांतील रहिवाशांसाठी मलउंदचन केंद्र बांधण्यासाठी पीएपी भुखंड क्रमांक ५९१/ ५९२ एमआयडीसीकडून पालिकेकडे हस्तांतरीत करण्यात येणार होता. एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या एकत्रित बैठकित निर्णय होवून सदर भूखंड महापालिकेकडे तात्काळ हस्तांरित करणे बाबतच्या सूचना देवून देखील त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले असल्याचा आरोप सोनवणे यांनी केला आहे. 

त्यामुळे भुखंड वाटपात मोठा भ्रष्टाचार करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा सार्वजनिक वापराच्या जागा घाईघाईने प्रकल्पग्रस्ताच्या नावाखाली वाटप केल्या, परंतू त्याठिकाणी वाटप झालेल्या भूखंडावर बांधकाम करत असलेली व्यक्ती ही प्रकल्प ग्रस्त नसून, प्रकल्पग्रस्तांना तूटपूंजी रक्कम देवून हा भूखंड हे गुणतंवणूक दारांने हडप केला असल्याचे सुधाकर सोनवणे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. नवी मुंबई महानरपालिकेकडून या ठिकाणी मलउंदचन केंद्र बांधणे प्रस्तावित असातना एमआयडीसीने त्याठिकाणी ज्या व्यक्तीस भूखंड वाटप झालेला आहे त्यालाच बांधकाम परवानगी दिलेली आहे. त्यामुळे तात्काळ हा भूखंड मनपाकडे सार्वजनिक वापरासाठी हस्तांतरीत करून या ठिकाणी मलउंदचन केंद्र उभे करुन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी सोनवणे यांनी केली आहे. यांसदर्भात एमआयडीसीचे प्रादेशिक आधिकारी सतीश बागल यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख