खाटांची अडवणूक करणाऱ्यांचा नवी मुंबई पालिका शोध घेणार

नवी मुंबई महापालिकेतर्फे कोव्हिड रुग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या केंद्र आणि प्रयोगशाळेचे १०सप्टेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्‌घाटन करण्यात आले. या प्रसंगी ठाकरे यांनी बोलताना विनाकारण खाटा अडवणाऱ्या रुग्णांबाबत प्रश्‍न उपस्थित केला. याआधी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील अशा विनाकारण खाटा अडवणाऱ्या लोकांचा उल्लेख केला होता
Navi Mumbai Corporation Keeping Eye on Oxygen Beds
Navi Mumbai Corporation Keeping Eye on Oxygen Beds

नवी मुंबई  : विनाकारण आयसीयू आणि ऑक्‍सिजनच्या खाटा अडवणूक करणाऱ्यांचा शोध घेण्याचा महत्त्वाचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे. आयुक्त अभिजीत बांगर यांनी त्यासाठी आरोग्य विभागातील डॉक्‍टरांना खासगी रुग्णालये तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशा प्रकारे शोध घेणारी नवी मुंबई ही राज्यातील पहिलीच महापालिका ठरली आहे.

नवी मुंबई महापालिकेतर्फे कोव्हिड रुग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या केंद्र आणि प्रयोगशाळेचे १० सप्टेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्‌घाटन करण्यात आले. या प्रसंगी ठाकरे यांनी बोलताना विनाकारण खाटा अडवणाऱ्या रुग्णांबाबत प्रश्‍न उपस्थित केला. याआधी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील अशा विनाकारण खाटा अडवणाऱ्या लोकांचा उल्लेख केला होता. राज्यातील बहुतांश शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये काही धनिक रुग्णालयांमध्ये आवश्‍यकता नसतानाही आयसीयू आणि ऑक्‍सिजनच्या खाटा अडवून ठेवत आहेत. अशा व्यक्तींमुळे अत्यावस्थ रुग्णांना योग्यवेळी खाट उपलब्ध होत नाही. काही जणांना वेळेवर आयसीयू न मिळाल्यामुळे जीव देखील गमवावा लागत आहे. 

त्यामुळे अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त करण्याची गरज असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. याची दखल घेत बांगर यांनी अशा रुग्णांना शोधण्याची मोहीम आखली आहे. शहरातील खासगी रुग्णालयांना सरकारच्या नियमांनुसार ८० टक्के खाटा सरकारी, तर २० टक्के खाटा खासगी रुग्णालयांना त्यांच्या रुग्णांसाठी वापरू शकतात. ज्या रुग्णालयांमध्ये हे प्रमाण बिघडलेले असते. अशा संशयित रुग्णालयांमध्ये अचानक तज्ज्ञांचे पथक भेट देऊन आयसीयू आणि ऑक्‍सिजनच्या खाटांवरील रुग्णांना तपासणार आहे. एखाद्या रुग्णाला दिल्या जाणाऱ्या उपचाराची तपासणी आणि त्याला होत असणारा त्रास तपासून त्याला खरंच या उपचारांची गरज आहे की नाही हे उघड होणार आहे. अशा पथकांमुळे रुग्णालयांमध्ये होत असणारी विनाकारण खाटांची अडवणूक उघडकीस येणार आहे.

खासगी रुग्णालयांतील आयसीयू खाटा भरल्या
नवी मुंबई शहरात पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण आणि ठाणे जिल्ह्याच्या शेजारच्या जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहेत. त्यामुळे या नागरिकांच्या आडून जिल्ह्याबाहेरील रुग्ण शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात भरती झाले आहेत. बहुतांश रुग्ण आयसीयूमध्ये असल्याने खासगी रुग्णालयांमधील आयसीयू फुल्ल झाले आहेत. महापालिकेने 21 खासगी रुग्णालयांना महापालिकेतर्फे कोव्हिड अधिग्रहीत रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. या रुग्णालयांमध्ये असणारे आयसीयू भरून गेले आहेत. एकाही खासगी रुग्णालयात आयसीयूच्या खाटा उपलब्ध राहिलेल्या नाहीत.

नवी मुंबईतील खाटांची संख्या
एकूण आयसीयू खाटा - 336
भरलेल्या आयसीयू खाटा - 321
उपलब्ध आयसीयू खाटा - 15

रुग्णालयांमधील आयसीयूतील खाटांची विनाकारण अडवणूक करणाऱ्यांना शोधता येऊ शकते. काही तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या पथकांना अचानक खासगी रुग्णालयांना भेटी देऊन आयसीयूतील रुग्णांना दिल्या जाणाऱ्या उपचारांची चौकशी करून उघड होईल. तशा प्रकारच्या सूचना पालिकेच्या पथकांना देण्यात येणार आहेत.
- अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका.

Edited By- Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com