नागपूर आणि पुण्यापाठोपाठ नवी मुंबई मेट्रोलाही चालना

सिडकोकडून नवी मुंबईमध्ये साकारण्यात येणाऱ्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील सीबीडी-बेलापूर ते पेंधर मार्ग या ११.१ किलोमीटरच्या मार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी सिडकोने महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनची (महा मेट्रो) नियुक्ती केली आहे.
Metro
Metro

नवी मुंबई  : सिडकोकडून नवी मुंबईमध्ये साकारण्यात येणाऱ्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील सीबीडी-बेलापूर ते पेंधर मार्ग या ११.१ किलोमीटरच्या मार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी सिडकोने महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनची (महा मेट्रो) नियुक्ती केली आहे. महामंडळाने संमती दिल्यानंतर साधारणतः एक वर्षाच्या कालावधीत महा मेट्रो हे काम पूर्ण करणार आहे.

नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने सिडको नवी मुंबईमध्ये मेट्रो प्रकल्प साकारत आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये बेलापूर ते पेंधर या मार्गावर मेट्रोची चाचणी यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली होती. या चाचणीनंतर लवकरच मेट्रो धावेल, अशी अपेक्षा नागरिकांना होती; मात्र मनुष्यबळाची कमतरता आणि नियोजन नसल्यामुळे पुन्हा सिडकोचे काम रखडले होते; मात्र सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर डॉ. संजय मुखर्जी यांनी मेट्रो प्रकल्पासाठी नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा सखोल अभ्यास केला. 

त्यानुसार विद्युत पुरवठा, माहिती तंत्रज्ञान, स्थापत्य आणि यांत्रिकी-अभियांत्रिकी, दूरसंचार आणि संदेशवहन या विविध बाबींमध्ये भरीव काम करण्याचे निश्‍चित झाले. सद्यस्थितीत बेलापूर ते पेंधर मार्गावर उभारण्यात येणाऱ्या ११ स्थानकांपैकी १ ते ६ स्थानकांच्या उभारणीचे काम काही तांत्रिक कारणांमुळे रखडले आहे. तसेच कोव्हिड- १९ मुळे उद्‌भवलेल्या स्थितीमुळे अपेक्षित गतीने होत नव्हते. यामुळे सदर मार्गावरील उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करणे आणि प्रकल्पासाठी आर्थिक स्रोत निर्माण करण्यासाठी या मार्गाचे काम महामेट्रो यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मेट्रोउभारणीचा अनुभव
महामेट्रो या कंपनीला नुकत्याच यशस्वीरीत्या कार्यान्वित झालेल्या नागपूर मेट्रो टप्पा १ आणि पुणे मेट्रो प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या मार्ग क्र. १ आणि २ च्या बांधणी, अंमलबजावणी आणि परिचालन आणि देखभालीचा अनुभव आहे. त्यामुळे नवी मुंबई मेट्रोच्या बेलापूर ते पेंधर या मार्गावरील उर्वरित कामांची जलदगतीने अंमलबजावणी करताना महामेट्रोच्या अनुभवाचा फायदा होणार आहे.

प्रकल्पासाठी अर्थपुरवठा, आर्थिक शिस्त, मेट्रो मार्गालगतच्या जमिनीचे मुद्रीकरण, प्रवासी भाड्याव्यतिरिक्त अन्य महसूल वाढवणे आणि उत्तम परिवहन जोडणी देणे, या बाबींवरही आपण लक्ष केंद्रित करणार आहोत - डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com