रायगड जिल्ह्यात कन्टेंमेंट झोनचे शतक; पनवेल तालुका अव्वल

सील केलेल्या परिसरात बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या आटोक्‍यात आल्यानंतरच ते परिसर कन्टेंमेट झोनच्या निर्बंधातून वगळण्यात येतात. मात्र, रायगड जिल्ह्यात १०० पैकी केवळ नऊ झोनच यातून वगळण्यात आले आहेत
Containment Zones in Raigad District crossed one Hundred Mark
Containment Zones in Raigad District crossed one Hundred Mark

अलिबाग  : चौथा लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वेगाने झाल्याने एकूण बाधितांचा आकडा ८४० हून अधिक झाला आहे. हा फैलाव रोखण्यासाठी जास्त प्रमाणात बाधित रुग्ण सापडणारे परिसर कन्टेंमेंट झोन म्हणून जाहीर करत सील करण्यात येत आहेत. अशा कन्टेंमेंट झोनचे शतक पूर्ण झाले आहे. यातील ५१ कंन्टेंमेंट झोन एकट्या पनवेल तालुक्‍यात आहेत.

सील केलेल्या परिसरात बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या आटोक्‍यात आल्यानंतरच ते परिसर कन्टेंमेट झोनच्या निर्बंधातून वगळण्यात येतात. मात्र, रायगड जिल्ह्यात १०० पैकी केवळ नऊ झोनच यातून वगळण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढत आहे, हे स्पष्ट होत आहे. यावरून कोरोनाचा प्रसार रोखण्यात जिल्हा प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही, हे दिसून येत आहे. त्यामुळे काळजीचे वातावरण आहे. 

सर्व ठिकाणे केली सील

४ मेपर्यंत जिल्ह्यात केवळ १४ कन्टेंमेंट झोन होते. बुधवारी (ता. २७) पनवेल तालुक्‍यातील आदई येथील प्रयाग गॅलेक्‍सी हाऊसिंग सोसायटी, माणगाव तालुक्‍यातील पन्हाळघर, अलिबाग तालुक्‍यातील कोळगाव, तळा तालुक्‍यातील शेनाटे परिसर, पोलादपुरातील पळचिल आणि उरणमधील बोरीपाखाडी परिसर येथे कन्टेंमेंट झोन जाहीर करत परिसर सील करण्यात आले आहेत. अशा सील केलेल्या परिसरांची संख्या १०० झाली आहे.

केवळ ९ ठिकाणी कंटेनमेंट झोन नाही

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कन्टेंमेंट झोनमधील नागरिकांना झोनमधून बाहेर पडण्यास मनाई केली आहे. येथील नागरिकांच्या आरोग्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. उरण तालुक्‍यातील कोटनाका व जेएनपीटी टाऊनशिप येथे पहिला कन्टेंमेंट झोन जाहीर झाला होता. त्यानंतर कन्टेंमेंट झोनची संख्या सातत्याने वाढत गेली. परंतु, फैलाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांना यश न आल्याने आतापर्यंत फक्त नऊ ठिकाणांची कन्टेंमेंट झोनच्या निर्बंधांमधून सुटका झाली आहे. तर ९१ ठिकाणी कन्टेंमेंट झोन कायम आहे.

सुटका झालेले परिसर

शास्त्रीनगर- विणानगर (खालापूर), सुगवेकर आळी, मोरेश्वर अपार्टमेंट (नेरळ), भोस्ते गाव (श्रीवर्धन), जासई (उरण), नगरपंचायत हद्द (पोलादपूर), कोटनाका व जेएनपीटी टाऊनशिप (उरण), चिंचवली गोहे (खालापूर), बिरवाडी (महाड), साई गणेश रेसिडेन्सी (उलवे).

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com