मे महिन्यात २७ लाख जणांनी घेतला शिवभोजनाचा लाभ : भुजबळांची माहिती

मे महिन्यातील पंचवीस दिवसांत राज्यातील १.४४ कोटी शिधापत्रिका धारकांना ६५.८० लाख क्विंटल अन्नधान्याचे वाटप झाले आहे. सत्तावीस लाख गरजूंना शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
Chagan Bhujbal Informs about Distribution of Food grains
Chagan Bhujbal Informs about Distribution of Food grains

नाशिक : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने अतिशय संवेदनशीलपणे काम केले आहे. प्रशासन कोणत्याही गरजू व्यक्तीला मदत करण्यास तप्तर असते. त्यामुळे एकट्या मे महिन्यात राज्यातील बावन्न हजार स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे. मे महिन्यातील पंचवीस दिवसांत राज्यातील १.४४ कोटी शिधापत्रिका धारकांना ६५.८० लाख क्विंटल अन्नधान्याचे वाटप झाले आहे. सत्तावीस लाख गरजूंना शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. 

ते म्हणाले, ''राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे सात कोटी आहे. या लाभार्थ्यांना ५२ हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. राज्यात या योजनेमधून सुमारे १९ लाख ७७ हजार १९१ क्विंटल गहू, १५लाख १८ हजार ९२५ क्विंटल तांदूळ, तर २१ हजार ९८ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेल्या परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे ३ लाख ९९ हजार ५७९ शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

२३ लाख क्विंटल तांदुळाचे वाटप

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. ४ मे पासून एकूण १ कोटी ३ लाख ७१ हजार ८२५ रेशनकार्ड ला मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्ड वरील ४ कोटी ६६ लाख ८ हजार लोकसंख्येला २३ लाख ३० हजार ४०० क्विंटल तांदुळाचे वाटप झाले आहे. 

राज्य शासनाने कोविड-१९ संकटावरील उपाययोजनेसाठी ३ कोटी ०८ लाख ४४ हजार ०७६ एपीएल केसरी लाभार्थ्यांना मे व जून २०२० या दोन महिन्यासाठी प्रती व्यक्ती ५ किलो धान्य सवलतीच्या दराने ( गहू ८ रुपये प्रति किलो व तांदूळ १२ रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे वाटप दि. २४ एप्रिल २०२० पासून सुरू होऊन आता पर्यंत ७ लाख ५३ हजार ८१० क्विंटल धान्याचे वाटप केले आहे.

कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कारवाई

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रती रेशनकार्ड एक किलो मोफत डाळ (तूर किंवा चणा डाळ) देण्याची तरतूद आहे. या योजनेतून सुमारे ५१ हजार ७९८ क्विंटल डाळीचे वाटप केले आहे. राज्यात १ ते २५  मे दरम्यान ८२२ शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे २७ लाख २८ हजार ५०२ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले. टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे. 
... 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com