धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याने संशय निर्माण झाला - Dhanajay Mundhes coment made more doubts says Fadanvis | Politics Marathi News - Sarkarnama

धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याने संशय निर्माण झाला

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 13 जानेवारी 2021

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात दुस-या पत्नीच्या बहिणीने बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणात मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संशयाचे वातावरण आहे.

नाशिक : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात दुस-या पत्नीच्या बहिणीने बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणात मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संशयाचे वातावरण आहे. त्यामुळे आता पोलिसांनीच या प्रकरणातील सत्य बाहेर आणावे असे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

श्री. फडणवीस यांच्या हस्ते कुर्तकोटी शंकराचार्य न्यास संकुलातील सभागृहात नाना नवल यांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या कार्यक्रमप्रसंगी ते म्हणाले, सध्या राज्यातील सत्ताधारी मंडळींना आरोप करण्याची सवय झाली आहे. केंद्र सरकारकडून अन्याय होत असल्याची तक्रार ते सतत करीत असतात. त्यामुळेच कोरोना लसीकरणासाठी कमी लस मिळाली असे त्यांनी म्हटले आहे. मात्र अपुरी लस मिळाली हा आरोप खोटा आहे. राज्य सरकार आपला नाकर्तेपणा लपविण्यासाठी हे कीरत आहेत. नाकर्तेपणा लपविण्याचा त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. 

देशातील कृषी विधेयकांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याविषयी विचारले असता, स्थगिती दिली आहे. त्यासाठी समिती नियुक्त केली आहे. त्यामुळे ही समिती सर्व शंका दूर करील. त्यांच्या चौकशीनंतर सर्व शंकांचे निरसन होईल. या  निर्णयाने केंद्र सरकारशी संबंधीत कोणताही परिणाम होईल असे काहीच झालेले नाही. 

यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, भाजपचे नेते सुरेश बाबा पाटील. खासदार डॅा भारती पवार, माजी मंत्री जयकुमार रावल, रमेश पतंगे आदी उपस्थित होते. 
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख