Breaking नागपूरमध्ये १५ ते २१ मार्च दरम्यान लाॅकडाऊन

नागपूरमध्ये १ लाख ६२ जणांना वर्षभरात कोरोनाची लागण झाली आहे. ४२१५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आताही नागपूरमध्ये कोरोनाची संख्या वाढत असल्याने नाईलाजाने लाॅकडाऊनचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले
Lock Down
Lock Down

नागपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागपूरमध्ये १५ ते २१ मार्च या काळात लाॅकडाऊन करण्याची घोषणा पालकमंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली. या लाॅकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सेवा बंद राहणार आहेत. दवाखाने, बँका सुरु राहणार असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे.

नागपूरमध्ये १ लाख ६२ जणांना वर्षभरात कोरोनाची लागण झाली आहे. ४२१५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आताही नागपूरमध्ये कोरोनाची संख्या वाढत असल्याने नाईलाजाने लाॅकडाऊनचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. २४ तासात शहरात १७०० रुग्णसंख्या झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 

होम क्वारंटाईन असलेल्यांनी बाहेर पडू नये असे आवाहन त्यांनी. पोलिसांना कडक संचारबंदीचे आदेश देण्यात आले असून.  नागरिकांना विनाकारण फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांना कडक संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत, असेही राऊत यांनी सांगितले.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com