अमरावती, यवतमाळ, अकोला जिल्ह्यात कंटेनमेंट झोन जाहीर करण्याचे आदेश - Chief Secretary Orders Containment Zone Formation in Three Vidarbaha Districts | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

अमरावती, यवतमाळ, अकोला जिल्ह्यात कंटेनमेंट झोन जाहीर करण्याचे आदेश

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

: राज्यातील अमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. या जिल्ह्यातील ज्या भागात रुग्णसंख्या अधिक आहे, तेथे कंटेनमेंट झोन जाहीर करुन तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यसचिव संजय कुमार यांनी तिन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

मुंबई  : राज्यातील अमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. या जिल्ह्यातील ज्या भागात रुग्णसंख्या अधिक आहे, तेथे कंटेनमेंट झोन जाहीर करुन तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यसचिव संजय कुमार यांनी तिन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुका, अमरावती महापालिका क्षेत्र, यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, पुसद आणि पांढरकवढा नगरपालिका क्षेत्र आणि अकोला जिल्ह्यातील अकोट व मुर्तिजापूर तालुका आणि अकोला महापालिका क्षेत्रामध्ये कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळत आहे. या भागातील संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे सर्व क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे मुख्य सचिवांनी निर्देश दिले आहेत.

सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांमध्ये कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवावे. एका रुग्णामागे किमान २० ते ३० निकटसहवासितांची तपासणी करुन चाचण्यांचे प्रमाण वाढवावे आणि पॉझिटिव्हिटी दर १० टक्‍क्‍यांपेक्षा खाली आणावा, असे निर्देश आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना दिले आहेत. ज्या भागात नवे रुग्ण आढळत आहेत, तेथे चाचण्यांची संख्या वीसपटीने वाढविण्याचे तसेच लक्षणे असलेल्या रुग्णांची आरटी-पीसीआर चाचणी करण्याची सूचना देण्यात आली आहे.

उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करा!
सार्वजनिक ठिकाणी विशेषत: सार्वजनिक स्वच्छता गृह, बस आणि रेल्वे स्थानके अशा ठिकाणी निर्जंतुकीकरण करावे. सार्वजनिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये मर्यादित उपस्थिती आणि मास्कचा वापर सक्तीने करण्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. संबंधित यंत्रणांनी प्रभावी उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख