बंदी झुगारत वाई तालुक्यात बावधनची बगाड यात्रा

वाई तालुक्यातील बावधन येथील बगाड यात्रा राज्यात प्रसिद्ध आहे. या वर्षी कोरोनो रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वाईच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले राजापूर कर यांनी १४४ कलम लागु करुन बगाड यात्रेवर बंदी घातली होती.
Satara Bagad Rally
Satara Bagad Rally

सातारा : शासकीय नियम धाब्यावर बसवत वाई तालुक्यातील बावधन येथील बगाड यात्रा काढण्यात आली.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बगाड यात्रा काढू नये असे आदेश असताना ही नियम धाब्यावर बसवत बगाड यात्रा झाली. Bagad Rally in Satara Flouting Corona Rules

वाई (Wai) तालुक्यातील बावधन येथील बगाड यात्रा राज्यात प्रसिद्ध आहे. या वर्षी कोरोनो (Corona) रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वाईच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले राजापूर कर यांनी १४४ कलम लागू करुन बगाड यात्रेवर बंदी घातली होती.

सातारा (Satara) जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने  जिल्हा प्रशासनाने यात्रा-जत्रावर बंदी घातली आहे. आज 2 एप्रिल रोजी वाई तालुक्यातील बावधन येथील बगाड यात्रा होती. या यात्रेवर ही जिल्हा प्रशासनाने बंदी घातली होती. मात्र ही बंदी झुगारून येथील ग्रामस्थांनी हजारोच्या संख्येने एकत्र येत बगाड यात्रा उत्साहात साजरी केली.

आज प्रशासनाची बंदी झुगारून बावधन गावच्या हजारो ग्रामस्थांनी एकत्र  येत पहाटे तीन वाजल्या पासून पोलिस प्रशासनाला हुलकावणी देऊन  सोनेश्वर येथील कृष्णा नदी  काठावर विधीवत पुजा करुन पोलिस महसूल प्रशासनाच्या साक्षीने शेकडो बैल जोड्या लावून काशिनाथाचे चांगभलच्या गजरात बगाड काढले. Bagad Rally in Satara Flouting Corona Rules

पिढ्यान पिढ्या चालत आलेली बगाडाची परंपरा येथील युवा शक्तीच्या ताकतीने अखंडित ठेवली. या आधी ब्रिटिश सरकारने आणि ब्रिटिश पोलिस प्रशासनाने देखील पिढ्यान पिढ्या येथील बगाड यात्रेला बंदी घातली होती पण त्याही वेळेस संपूर्ण बावधन गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन मनगटाच्या ताकतीवर ब्रिटिश सरकारने घातलेल्या बंदीला झुगारुन  बगाड यात्रा साजरी करुन दाखवली होती. त्याचा प्रत्यय आजच्या यात्रेतही आला. आता जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com