....म्हणून मुख्यमंत्र्यांनी उजनीच्या पाण्याचा निर्णय रद्द केला    - ...So the Chief Minister canceled the decision of Ujani water : MLA Shahaji Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

....म्हणून मुख्यमंत्र्यांनी उजनीच्या पाण्याचा निर्णय रद्द केला   

दत्तात्रेय खंडागळे 
गुरुवार, 20 मे 2021

मात्र, येथील जनतेची अपेक्षा पूर्ण झाली नाही.

सांगोला (जि. सोलापूर) : उजनी धरणाचे (Ujani dam) पाणी इंदापूरला (Indapur) देण्याबाबत राज्य सरकारने काढलेल्या आदेशामुळे सोलापूर (Solapur) जिल्ह्यात जनक्षोभ उसळला होता. जिल्ह्यातील जनतेची भावना आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचविल्या, त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी हा आदेश रद्द करून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय दिला आहे, असा दावा सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील (MLA Shahaji Patil) यांनी केला आहे.(....So the Chief Minister canceled the decision of Ujani water : MLA Shahaji Patil)

उजनीचे पाणी इंदापूरला देण्याचा आदेश राज्य सरकारने काढला होता. राज्य सरकारच्या या आदेशाविरोधात जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी टीकेची झोड उठवली होती. सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी याबाबत अतिशय आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारच्या या निर्णयास कडाडून विरोध केल. तसेच, रक्तरंजित लढाईचा इशाराही दिला होता. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला हा घरचा आहेर ठरला. शिवाय आमदार पाटील यांनी या विषयावर बोलताना केलेली टीका हा राज्यभर चर्चेचा विषय झाला. 

हेही वाचा : मोहिते पाटलांची हुजरेगिरी करूनच संजय शिंदे आमदारकीपर्यंत पोचले

आमदार पाटील म्हणाले की, दुष्काळी सोलापूर जिल्ह्यासाठी उजनी धरण वरदायिनी आहे. सोलापूर जिल्हा सिंचन व पिण्याचे पाणी यासाठी उजनीवर अवलंबून आहे. उजनी पाणीवाटप यापूर्वी ठरले असतानाही त्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रचंड जनक्षोभ माजल्याने आपण याबाबत परखडपणे व्यक्त झालो. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व जनतेची व्यथा खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली. मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या भावना लक्षात घेऊन उजनीच्या बाबत काढलेला आदेश तत्काळ रद्द केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा आदेश रद्द करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय दिला आहे.

सांगोला विधानसभा मतदार संघाकरिता १९९७ मध्ये उजनीचे ३.८१ टीएमसी पाणी पिलीव ते सांगोला असे देण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली होती. पुढे २००० मध्ये यास प्रशासकीय मान्यता देताना यातील १.८१ टीएमसी पाणी भूम-परांड्याकडे वळविण्यात आले. फक्त सांगोला तालुक्यासाठी दोन टीएमसी पाणी दिले. या प्रशासकीय मंजुरीसोबतच या कामासाठी ७५ लाख रुपयांचा निधीही आरक्षित करण्यात आला होता, असे पाटील यांनी सांगितले. 

पवारांकडून येथील लोकप्रतिनिधी योजना मार्गी लावतील अशी अपेक्षा होती

सुमारे ११७  टीएमसी साठवण क्षमता असणाऱ्या उजनी धरणाच्या निर्मितीपासून एक थेंबही पाणी अद्यापपर्यंत सांगोला तालुक्याला मिळालेले नाही. पंचवीस वर्षाहून अधिक काळ उजनीच्या पाण्यासाठी सांगोल्यातील जनता संघर्ष करत आहे. या भागाचे प्रतिनिधित्व करणारे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडून त्यांच्या कार्यकाळात सांगोला उपसा सिंचन योजना मार्गी लावून घेतील, अशी आमची अपेक्षा व भावना होती. मात्र, येथील जनतेची अपेक्षा पूर्ण झाली नाही. त्यामुळे हा उद्रेक असून पाणी मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असे आमदार शहाजी पाटील यांनी सांगितले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख