ब्रेकिंग न्यूज : दिग्गज आमदारांचा भरणा असलेला सोलापूर जिल्हा दूध संघ बरखास्त 

प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदी विभागीय दुग्ध उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Board of Directors of Solapur District Cooperative Milk Producers Association dismissed
Board of Directors of Solapur District Cooperative Milk Producers Association dismissed

सोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. या दूध संघावर आता प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. दूध संघामध्ये झालेली अनियमितता, घटलेले दूध संकलन, बिघडलेली आर्थिक शिस्त या कारणास्तव प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आल्याची माहिती पुणे विभागाचे दुग्ध उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी सोमवारी (ता. 8 मार्च) पत्रकार परिषदेत दिली. 

सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदी विभागीय दुग्ध उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदस्य म्हणून सहायक निबंधक आबासाहेब गावडे, सहकार अधिकारी सुनील शिंदे यांची नियुक्ती झाली असून या तीनही प्रशासक मंडळ सदस्यांनी आज पदभार स्वीकारला आहे. 

माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते दिलीप माने यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ कार्यरत होते. आमदार संजयमामा शिंदे, आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह दिग्गज मंडळी सोलापूर जिल्हा दूध संघावर संचालक म्हणून कार्यरत होते. 


हेही वाचा : महिला दिनी अजित पवारांकडून महिलांना मोठे गिफ्ट 

मुंबई : महिला दिनाचे औचित्य साधून राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यातील महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना, विद्यार्थिनींच्या मोफत बस प्रवासासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने योजना असणार आहे. तसेच, घरकाम करणाऱ्या महिलांसाठी संत जनाबाई सामजिक सुरक्षा व कल्याण योजना आदींचा समावेश आहे. याशिवाय, राज्य राखीव पोलिस दलात स्वतंत्र महिला गटही स्थापन करण्याची घोषणा अर्थमंत्री पवार यांनी केली. 

घरखेदी मुद्रांक शुल्कात 20 टक्के सवलत 

राज्यात महिलांचे नावे घर खरेदी करणाऱ्यांसाठी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना जाहीर करण्यात आली आहे. यात महिलेच्या नावाने घरखरेदी केल्यास त्या घराच्या एकूण मुद्रांक शुल्काच्या 20 टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून होणार आहे. 

विद्यार्थिनींसाठी मोफत बस प्रवास 

राज्यात मुलींचे बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाते. राज्यातील सर्व ग्रामीण भागातील मुलींना गावापासून शाळेपर्यंत येण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सोय करून देणारी राज्यव्यापी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने योजना असणार आहे. त्यासाठी सरकारकडून परिवहन विभागास 1500 पर्यावरणपूरक व हायब्रीड बस देण्यात येतील. मोठ्या शहरातील महिलांच्या सुरक्षित आणि सुलभ प्रवासासाठी तेजस्विनी योजनेंतर्गत आणखी विशेष महिला बस देण्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com