मोठी बातमी : उजनीतून इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय रद्द : जयंत पाटलांची घोषणा 

त्यामुळे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांना जिल्ह्यात फिरणे मुश्‍किल झाले होते.
Big news: Decision to supply water to Indapur from Ujani dam canceled: Jayant Patil's announcement
Big news: Decision to supply water to Indapur from Ujani dam canceled: Jayant Patil's announcement

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांबरोबरच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी उजनी धरणातून इंदापूरला पाच टीएमसी पाणी देण्यास तीव्र विरोध केल्यानंतर आज (ता. १८ मे) राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी इंदापूरला पाणी देण्यासंदर्भातील निर्णय रद्द करत असल्याची घोषणा केली. (Big news: Decision to supply water to Indapur from Ujani dam canceled: Jayant Patil's announcement)

पुणे शहरातून वाहून येणारे सांडपाणी उजनी धरणातून इंदापूर तालुक्यातील २२ गावांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वी घेतला आहे. त्या निर्णयानुसार उजनीतून पाच टीएमसी पाणी उचलण्यात येणार होते. त्याला सोलापूर जिल्ह्यातून तीव्र विरोध झाला होता. भारतीय जनता पक्षाच्या आमदारांसह महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेस पक्षानेही याला कडाडून विरोध केला होता. सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी तर खुद्द शरद पवार यांच्यावर टीका केली होती.

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा-पंढरपूर, करमाळा, उत्तर, दक्षिण सोलापूर, अक्‍कलकोट या तालुक्‍यातील बऱ्याच गावांना उजनीतून अजूनही पाणी मिळू शकलेले नाही. अशी परिस्थिती असताना उजनीतून पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्‍यासाठी नेण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला होता. त्यावरून भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेसह शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. अनेकदा आंदोलनेही केली. त्यामुळे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांना जिल्ह्यात फिरणे मुश्‍किल झाले होते. त्यानंतर सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारने हा निर्णय रद्दची मागणी केली होती. त्या एकीला आज अखेर यश मिळाले आणि हा निर्णय रद्दची घोषणा झाली.

सोलापूर जिल्ह्यातून वाढता विरोध लक्षात घेऊन त्यासंदर्भात दोन-तीन वेळा बैठकाही झाल्या. त्यावेळी सर्वांनी हा आदेश रद्द करण्याची मागणी लावून धरली होती. त्यासाठी आमदार संजय शिंदे, यशवंत माने, माजी आमदार दिपक साळुंखे, उमेश पाटील, उत्तमराव जानकर, कल्याणराव काळे, निरंजन भूमकर आदींनी जलसंपदा मंत्र्यांची मंगळवारी भेट घेऊन निर्णय रद्दची मागणी केली होती. जिल्ह्यातील राजकीय वातावरण पाणी प्रश्‍नावरून ढवळल्यानंतर उशीरा का होईना जलसपंदा मंत्री जयंत पाटील यांनी हा निर्णय मागे घेतला आहे.
 
नव्या आदेशाकडे सोलापूरचे डोळे

उजनीत येणारे पाच टीएमसी सांडपाणी इंदापूर तालुक्‍यातील 22 गावांना देण्यासंदर्भातचा निर्णय जलसंपदा विभागाने 22 एप्रिल रोजी घेतला होता.  तो आदेश निघाल्यानंतर पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांचा निषेध नोंदविण्यात आला. तर शिवसेना, कॉंग्रेस, भाजपसह सर्वपक्षीय नेत्यांनी, शेतकरी संघटना, शेतकरी नेत्यांनीही महाविकास आघाडी सरकारवर टिकेची झोड उठविली. दरम्यान, त्या निर्णयासंदर्भात बरेच गैरसमज झाल्याची कबुली जलसंपदा मंत्र्यांनी दिली. तो आदेश रद्द करून सुधारित आदेश काढले जातील, असेही त्यांनी मंगळवारी सांगितले. त्यामुळे नव्या आदेशाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com