अकोल्यात आज तब्बल ४९ रुग्ण वाढले

ज अकोल्यात कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला. कोरोनामुळे आजवर ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात अकोल्यात मृत्युचा दर सर्वाधिक असून विदर्भात सर्वाधिक रुग्ण असलेला जिल्हा म्हणून अकोल्याची नोंद झाली आहे.
Akola Recorded Highest Corona Positive in Vidarbha
Akola Recorded Highest Corona Positive in Vidarbha

अकोला : अकोल्यामध्ये गेल्या २४ तासांत कोरोनाचे रुग्ण ७९ ने वाढले आहेत. आज एकाच दिवसात ४९ रुग्ण सापडले आहेत. अकोल्यात कोरोना बाधितांची संख्या ९६३ वर जाऊन पोहोचली आहे. 

आज अकोल्यात कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला. कोरोनामुळे आजवर ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात अकोल्यात मृत्युचा दर सर्वाधिक असून विदर्भात सर्वाधिक रुग्ण असलेला जिल्हा म्हणून अकोल्याची नोंद झाली आहे.

आज सकाळी प्राप्त अहवालात २२ महिला व २७ पुरुषांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.  त्यात पूरपिडीत कॉलनी येथील नऊ, अकोट फैल येथील सात,  शिवर येथील चार, बाळापूर येथील तीन,  मोठी उमरी येथील तीन,  खदान येथील तीन,  रेल्वे क्वार्टर येथिल तीन,  गुलजार पुरा येथील तीन,  सिंधी कॅम्प येथील दोन,  पातूर येथील दोन, जुने शहर येथील दोन, तर  तारफैल, संतोषिमातामंदिर जवळ,  छोटी उमरी,  गितानगर,  विजय नगर, शंकर नगर,  भगतवाडी डाबकी रोड, टेलिफोन कॉलनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. 

दरम्यान काल सायंकाळनंतर नऊ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यातील चार कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तर उर्वरित पाच जणांना घरी सोडण्यात आले.

दरम्यान काल (दि.११) रात्री एका ७८ वर्षीय पुरुष रुग्णाचे उपचार घेतांना निधन झाले. हा रुग्ण बाळापूर येथील रहिवासी होता. त्यास दि. ७ जून रोजी दाखल करण्यात आले होते.

आज एकूण पॉझिटिव्ह अहवाल-९६३ 

मयत-४४ (४३+१),

डिस्चार्ज-५८६

दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-३३३

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com