बसवेश्‍वर स्मारकासाठी राष्ट्रवादी, शिवसेनेच्या महिला नेत्यांनी पदर खोचला 

त्याची पूर्तता होणे आवश्‍यक असल्याचे म्हटले आहे.
Shiv Sena, NCP women leaders demand Eknath Shinde to erect memorial on Basaveshwar in Mangalweda
Shiv Sena, NCP women leaders demand Eknath Shinde to erect memorial on Basaveshwar in Mangalweda

मंगळवेढा : मंगळवेढा (जि. सोलापूर) येथील बहुचर्चित महात्मा बसवेश्वर स्मारकाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगराध्यक्षा अरुणा माळी व शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या शैला गोडसे यांनी पदर खोचला आहे. राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत निवेदन देत स्मारकाचा प्रश्‍न मार्गी लावण्याची विनंती केली. स्थानिक स्वराज्य संस्थेतील महिला लोकप्रतिनिधींनी स्मारकासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त करतानाच त्याची पूर्तता होणे आवश्‍यक असल्याचे म्हटले आहे. 

येथील महात्मा बसवेश्‍वर स्मारकाचा प्रश्‍न गेल्या पाच वर्षांपासून रखडला आहे. तत्कालीन भाजप-शिवसेना सरकारने या स्मारकासाठी समितीची स्थापना करत 35 एकर शासकीय जागा निश्‍चित केली होती.

या जागेत स्मारक, वस्तूसंग्रहालय व महात्मा बसवेश्वर यांच्याशी निगडित माहिती देणारी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. या स्मारकानंतर तालुक्‍यात भाविकांचा ओढा वाढणार आहे. या निमित्ताने तालुक्‍यातील बेरोजगार तरुणांना व्यवसायातून रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. 

सध्या मंगळवेढा तालुक्‍यात महामार्गाचे काम वेगाने पूर्णत्वाकडे जात असताना स्मारकाचा प्रश्नदेखील मार्गी लागणे आवश्‍यक आहे. पण, दुर्दैवाने या स्मारकाचा प्रश्न रखडत ठेवल्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गतवर्षी राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले. लोकनियुक्त नगराध्यक्षा अरुणा माळी या राष्ट्रवादीच्या आहेत, त्यांनी त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे यापूर्वीच मागणी केली आहे. 

नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे सोलापूर दौऱ्यावर आले असता त्या वेळी नगराध्यक्षा माळी यांनी या स्मारकप्रश्नी त्यांना निवेदन दिले. 


शिवसेनेच्या नेत्या शैला गोडसे यांनीही शिंदे यांना भेटून स्मारकाचा प्रश्‍न मार्गी लावण्याची मागणी केली. त्यामुळे रखडलेल्या बसवेश्वर स्मारकासाठी महिला लोकप्रतिनिधींनी घेतलेला पुढाकार हा निश्‍चितच कौतुकास्पद आहे. या दोघींचाही पक्ष राज्यात सत्तेवर आहे, त्यामुळे महात्मा बसवेश्‍वर स्मारकाचे काम मार्गी लागेल, अशी अशा मंगळवेढा तालुक्‍यातून व्यक्त होत आहे. त्यासाठी पाठपुरावादेखील महत्त्वाचा ठरणार आहे. 

तत्कालीन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना स्मारकासाठी जागा पाहणीदरम्यान शासकीय जागा दाखवण्यात आली होती. त्या वेळी काहींनी त्या जागेशेजारी तलाव असल्यामुळे त्या ठिकाणास विरोध केला होता. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक समुद्रात प्रस्तावित असताना बसवेश्वरांचे स्मारक तलावाशेजारी का नको, असा सवाल उपस्थित करत स्मारक, तलाव परिसरामुळे पर्यटन वाढीस वाव मिळणार आहे. 

- अरुणा माळी, 
नगराध्यक्षा, मंगळवेढा 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com