लसीकरणात कर्नाटकची आघाडी, महाराष्ट्र पिछाडीवर

शभरात कोरोना लस घेतलेल्यांची संख्या हळूहळू वाढत आहे. आत्तापर्यंत, देशात जवळपास १४ लाख जणांचे लसीकरण झाले आहे. गेल्या २४ तासांत तीन लाख ४७ हजार ५८ जणांनी लस घेतल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
Corona Vaccination
Corona Vaccination

नवी दिल्ली : देशभरात कोरोना लस घेतलेल्यांची संख्या हळूहळू वाढत आहे. आत्तापर्यंत, देशात जवळपास १४ लाख जणांचे लसीकरण झाले आहे. गेल्या २४ तासांत तीन लाख ४७ हजार ५८ जणांनी लस घेतल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ६, २४१ सत्रांत ३ लाख ४७ हजार ५८ जणांनी लस घेतली. आत्तापर्यंत लसीकरणाची अशी २४,४०८ सत्रे पार पडली आहेत. शनिवारी (ता.२३) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार १३ लाख ९० हजार ५९२ जणांनी देशव्यापी लसीकरण मोहिमेत लस घेतली.

कोरोना लसीकरणात कर्नाटकने बाजी मारली आहे. तिथे १ लाख ८४ हजार ६९९ जणांनी लस घेतली. त्यानंतर, आंध्र प्रदेशचा क्रमांक लागतो. या राज्यात १ लाख ३३ हजार २९८ जणांचे लसीकरण झाले आहे. त्यानंतर, ओडिशा (१,३०,००७) आणि उत्तर प्रदेश (१,२३,७६१) ही राज्ये लसीकरणात आघाडीवर आहेत. देशभरात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळलेल्या महाराष्ट्रात मात्र लसीकरणाची गती संथ आहे. आत्तापर्यंत, ७४,९६० जणांनी लस घेतली.


सर्वाधिक लसीकरणाची राज्ये
कर्नाटक
१,८४,६९९
आंध्र प्रदेश
१,३३, २९८
ओडिशा
१,३०,००७
उत्तर प्रदेश
१,२३, ७६१
तेलंगण
१,१०,०३१
महाराष्ट्र
७४,९६०
बिहार
६३,६२०
हरियाना
६२,१४२

सक्रिय रुग्णसंख्येत आणखी घट
देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येचा घटता आलेख शनिवारीही कायम होता. शनिवारी देशभरात कोरोनाचे १८ लाख पाच हजार ६६२ रुग्ण होते. एकूण रुग्णांच्या तुलनेत सक्रिय रुग्णांची टक्केवारी केवळ १.७४ आहे.

Edtied By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com