फैलाव कोरोनाचा - महाराष्ट्र-कर्नाटकात केंद्राकडून खास पथके

कोरोना महामारीचा पुन्हा उद्रेक झालेल्या महाराष्ट्र व पंजाबमध्ये विशेष आरोग्य पथके तातडीने पाठविण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. ही पथके आज-उद्या रवाना होतील व संबंधित राज्य सराकारांच्या मदतीने संक्रमणाची साथ नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करतील
Corona
Corona

नवी दिल्ली :  कोरोना महामारीचा पुन्हा उद्रेक झालेल्या महाराष्ट्र व पंजाबमध्ये विशेष आरोग्य पथके तातडीने पाठविण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. ही पथके आज-उद्या रवाना होतील व संबंधित राज्य सराकारांच्या मदतीने संक्रमणाची साथ नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करतील व केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला नियमित अहवाल देतील. या पथकात डॉक्‍टर व आरोग्य तज्ज्ञांसह भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) तज्ज्ञांचाही समावेश असेल.

कोरोना महामारीच्या सुरवातीच्या काळात राबविलेली टेस्ट-ट्रॅक-ट्‌कीट ही त्रिसूत्री आक्रमकपणे राबवा असे निर्देश केंद्राने संबंधित राज्यांना दिले आहेत. आरोग्य पायाभूत सुविधांचा दर्जा वाढविणे, चाचण्यांचा व लसीकरणाचा वेग वाढविणे, बेशिस्त नागरिकांवर कठोर कारवाई करणे याबाबतही हयगय न करण्याच्या सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत.

ष्ट्रासह काही राजयांत कोरोना परिस्थिती पुन्हा भयावह होत चालली असून कालच्या एकाच दिवसात 10 हजारांहून नवे रूग्ण आढळल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयात चिंतेचे वातावरण आहे. राज्यात 17 ऑक्‍टोबरनंतर एकाच दिवसात रूग्णसंख्येत झालेली ही पहिली मोठी वाढ आहे. एकाच दिवसांत रूग्णसंख्येत 250 टक्‍क्‍यांनी वाढ झाली. तिकडे पंजाबमधील परिस्थितीही बिघडत चालली आहे. त्यामुळे जालंधरसह अनेक शहरांत रात्र संचारबंदी जारी करण्यात आली आहे. विशेषतः ब्रिटनमधील नव्या विषाणूचे संक्रमण महाराष्ट्रासह काही राज्यांत वेगाने होत असल्याच्या वृत्ताने केंद्रीय यंत्रणा धास्तावली आहे. ब्रिटनमधून आलेला हा विषाणू झपाट्याने पसरतो व त्याचा परिणामही तेवढाच घातक ठरतो असे दिसून आले आहे. देशात नव्या विषाणूचा संसर्ग झालेल्यांचा आकडा 240 वर पोचला आहे.

देशातील 180 हून जास्त जिल्ह्यांत कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. वेगाने रूग्ण वाढणारांत महाराष्ट्रातील सर्वाधिक 6, पंजाब-5, केरळ-गुजारत 4-4 व मध्य प्रदेश 3 जिल्ह्यांचा समावेश आहे. राजधानी दिल्लीत आज 300 हून जास्त नवे रूग्ण आढळले. गेल्या एकाच आठवड्यात घरात विलीगीकरणात राहणारांची संख्या 37 टक्‍क्‍यांनी वाढली असून प्रतिबंधित (कंटेनमेंट) विभागांतही पुन्हा वाढ करण्यात आली आहे.

एकूण लसीकरण - 1 लाख 90 हजार कोटी (दिवसाला 10 हजार जणांना लसीकरण करणारा अमेरिकेनंतरचा दुसरा देश.)
- चाचण्या झालेल्यांची संख्या 22 कोटी 3 लाख.
एकूण रूग्णसंख्या -1 कोटी 11 लाख 91 हजार
बरे झाले - 1 कोटी 8 लाख
मृत्युमुखी पडले - 1 लाख 57 हजार 693
- मागील 24 तासांत- 18 हजार 292 नवे रूग्ण, 14 हजार 162 बरे झालेले, मृत्यू - 109
Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com