वीस लाख कोटींचे पॅकेज जाहीर करण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी घेतला यांचा सल्ला

नरेंद्र मोदी यांनी काही मंडळींशी चर्चा केल्याचे बोलले जात आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींशी त्यांनी सल्लामसलत केल्याचेही सांगण्यात येते आहे.
Narendra Modi
Narendra Modi

मुंबई : कोरोनासंकटातून बाहेर पडण्यासाठी २० लाख कोटींचे पॅकेज दाखल करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही मंडळींशी चर्चा केल्याचे बोलले जात आहे. माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जींशी त्यांनी सल्लामसलत केल्याचेही सांगण्यात येते आहे. 

नीती आयोग, पंतप्रधानंची आर्थिक सल्लागार परिषद या बरोबरच या पॅकेजची आखणी करताना नरेंद्र मोदी यांनी काही महत्वाच्या व्यक्तींशी धोरणात्मक चर्चा केली असावी, असे मानले जाते. गुरूमूर्ती हे संघ परिवारातील अर्थकारणाचे महत्वाचे भाष्यकार. स्वदेशीचा पुरस्कार  हे मोदींच्या  कथनातून समोर आले.

अरूण शौरी, सुब्रमण्यम स्वामी हे ही भाजपशी संबंधित पण त्यांचे दोघांचेही सध्या मोदी यांच्याशी पटत नाही. मात्र, मायक्रो पातळीवर या विषयासंबंधी देशात सर्वाधिक अभ्यास आहे तो प्रणवदांचा. 

गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या जवळ आलेल्या या अर्थव्यवस्थेच्या डॉक्टरशी पंतप्रधानांनी चर्चा केली आहे. मुखर्जी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमालाही गेले होते. आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी विशेष वीस लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

भारताच्या जीडीपीच्या दहा टक्के ही रक्कम असणार आहे. त्यातून देशातील विविध वर्गातील लोकसंख्येला त्याचा आधार मिळणार आहे. मजूर, कुटिरोद्योग, लघुउद्योग, मध्यमउद्योग, कोट्यवधी लोकांना याचा उपयोग होणार आहे.    

आत्मनिर्भर भारत

आत्मनिर्भर भारत, अशी घोषणा देत कोरोनामुळे संकटाला सामना करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले आहे. कोरोनाचे संकट एक संधी घेऊन आले आहे. आपला संकल्प हा या संकटापेक्षा मोठा असल्याचा आधार त्यांनी दिला. त्यासाठीच त्यांनी ही घोषणा केली आहे.

आत्मनिर्भऱतेसाठी ही लोकसंख्या ऊर्जेचा स्त्रोत असेल. देशातील मागणी वाढविण्यासाठी ती पूर्ण करण्यासाठी त्यासाठी प्रत्येक संंबधित घटकांच्या सूचना घेतल्या जातील. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com