गृह खात्याकडून आमची निवड गुणवत्तेनुसारच : त्या 636 फौजदारांचा दावा - home department selects us on merit only say 636 PSIS | Politics Marathi News - Sarkarnama

गृह खात्याकडून आमची निवड गुणवत्तेनुसारच : त्या 636 फौजदारांचा दावा

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 29 जून 2020

मच्या निवडी विरोधात अपप्रचार सुरू असल्याचे स्पष्टीकरण या उमेदवारांनी दिले. आम्ही देखील अतिशय कष्टाने चांगले गुण मिळवून परीक्षा उत्तीर्ण झाल्याने आमची निवड झालेली आहे.

पुणे : गुणवत्तेनुसार पदोन्नती करावी, या उच्च न्यायालयच्या आदेशानुसार आम्हाला पोलिस उपनिरीक्षकपदी बढती मिळाली आहे. त्यामुळे आमच्यावर शंका घेण्याचे कोणाचे कारण नाही, अशी भूमिका फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात फौजदार म्हणून नियुक्त झालेल्या 636 उमेदवारांनी मांडली आहे.

या उमेदवारांची पदोन्नीत आक्षेपार्ह असल्याचा मुद्दा आता चर्चिला जाऊ लागला आहे. त्यामुळे या उमेदवारांनी त्या पदोन्नतीत काहीच चूक नसल्याचा दावा केला आहे. विनाकारण आमच्या निवडी विरोधात अपप्रचार सुरू असल्याचे स्पष्टीकरण या उमेदवारांनी दिले. आम्ही देखील अतिशय कष्टाने चांगले गुण मिळवून परीक्षा उत्तीर्ण झाल्याने आमची निवड झालेली आहे. त्यामुळेच तत्कालीन सरकराने आम्हाला बढती देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. 

राज्य लोकसेवा आयोगाने 2016 मध्ये 828 पोलिस उपनिरीक्षकपदांसाठी पोलिस खात्यांतर्गत जाहिरात प्रसिद्ध केली होती. अंतिम निकाल जाहीर करताना पदोन्नतीमध्ये आरक्षण ठेवून निकाल आयोगाने जाहीर केला होता. पण उच्च न्यायालयाने २००४ च्या एका याचिकेवर ८२८ विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण सुरू असताना एक निकाल दिला. या निकालानुसार पदोन्नतीमध्ये आरक्षण नसावे, असा निर्णय आल्यामुळे ही प्रक्रिया बरीच किचकट झाली. आरक्षित वर्गातील उमेदवार निवड होऊनही बाहेर जाण्याचा धोका निर्माण झाल्याने जागा वाढवून त्यांना संधी देण्यात आली.    

त्यासाठी कट आॅफ हा 230 गुणांचा होता. या पेक्षा जास्त गुण मिळालेले आणि 636 उमेदवार होते. मात्र त्यांची निवड झाली नव्हती. कट आॅफ पेक्षा जास्त गुण असलेल्यांना सामावून न घेणे हा अन्याय असल्याचे आम्ही शासनाला सांगितले. त्यामुळे गृह विभागाने आम्हाला सेवेत सामावून घेतले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख